Diksha Naik‌ : ‘अवतरली तारका‌’त कुडाळची नृत्यांगना दीक्षा नाईक प्रमुख भूमिकेत

गाण्यातील बहुतांश सहकलाकारही कुडाळ- सिंधुदुर्गातील
Diksha Naik‌
‘अवतरली तारका‌’त कुडाळची नृत्यांगना दीक्षा नाईक प्रमुख भूमिकेत
Published on: 
Updated on: 

कुडाळ : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्या ‌‘अवतरली तारका‌’ या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित झाला. या गाण्याला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यात आशिष पाटील यांच्यासोबत कुडाळची सिंधुकन्या दीक्षा प्रमोद नाईक प्रमुख भूमिकेत झळकली आहे. विशेष म्हणजे या गाण्यातील बहुतांश सहकलाकारही कुडाळ- सिंधुदुर्गातील असून, हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

Diksha Naik‌
IFFI 2025: यंदाचा कंट्री फोकस जपान; आशियाई चित्रपट चाहत्यांसाठी पर्वणी

नृत्यांगना दीक्षा नाईक ही एका सर्वसामान्य कुटुंबातील असून कोरिओग्राफर रवी कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने नृत्यात चमक दाखवून जिल्हा स्तरावर अनेक पारितोषिके पटकावली आहेत. दरम्यान एका ऑडिशनमध्ये तिला सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक, लावणी किंग आशिष पाटील यांच्यासोबत काम करण्याची तिला संधी मिळाली. तिची ही मेहनत व गुरुचे मार्गदर्शन तिला अखेर लावणी किंग आशिष पाटील यांच्या गाण्यात भूमिका मिळवून देणारा ‌‘टर्निंग पॉईंट‌’ ठरला. आज लावणी किंग आशिष पाटील यांच्यासोबत दीक्षा महाराष्ट्रभर आपली नृत्यकला सादर करत आहे. या प्रवासात तिला आई - वडिलांचा खंबीर पाठिंबा मिळत असून तिची शाळा कुडाळ हायस्कूल च्या सर्व शिक्षकांचेही वेळोवेळी तिला सहकार्य मिळाले आहे. या गाण्याच्या निर्मिती प्रकल्पाला उद्योजक उमेश पाटील (वेतोरे) यांचे जिल्ह्यातील कलाकारांसाठी सहकार्य लाभले आहे. ‌‘अवतरली तारका‌’ या गाण्याला मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांचा आवाज लाभला आहे.

संगीत राहुल कदम व प्रणव चांदोरकर यांनी दिले असून, छायाचित्रण सूरज राजपूत यांनी केले आहे. गाण्याच्या मॅनेजमेंटची जबाबदारी ओंकार पंड यांनी तर असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून शाल्मली जरीपटके यांनी काम पाहिले. सहकलाकारांमध्ये संजना पवार, साक्षी परब, सिमरन नायर, सलोनी सावंत, दुर्वा परब, विशाखा धामापूरकर, तनिषा नाईक, अंतरा ठाकूर, प्राची जाधव व प्राची पाटकर यांचा समावेश आहे. या गाण्याच्या निर्मितीत श्री देव रामवर मंदिर (तेर्सेबांबर्डे) तसेच सुनील भोगटे, बादशाह शेख, प्रणाली वानखेडे, शेखर सातोसकर, निखिल कुडाळकर, सुजय जाधव, रश्मी नेमळेकर व महेश राऊळ डेकोरेटर्स यांचे सहकार्य लाभले. या गाण्याद्वारे सिंधुदुर्गातील प्रतिभावंत कलाकारांना महाराष्ट्रभर झळकण्याची संधी मिळाली आहे.

Diksha Naik‌
Haq movie | वादाच्या भोवऱ्यात का सापडला इम्रान हाश्मीचा 'हक' चित्रपट?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

Ramayana Lakshman Ravi Dubey
Maharashtra Sahitya Parishad
Maharashtra Sahitya Parishad
Premanand Maharaj Ashram