Red Okra: कोकण कृषीची लाल भेंडी घालणार तारुण्यात भर!

Konkan red okra benefits: लाल भेंडी ही केवळ आकर्षक रंगामुळे नव्हे, तर तारुण्यात भर घालणारी जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंटस् आणि पोषक घटकांनी समृद्ध असल्याने भविष्यातील महत्त्वाचे पीक ठरू शकते.
Konkan red okra benefits
Konkan red okra benefitsfile photo
Published on
Updated on

Konkan red okra benefits

दापोली : प्रवीण शिंदे

लाल भेंडी ही केवळ आकर्षक रंगामुळे नव्हे, तर तारुण्यात भर घालणारी जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंटस् आणि पोषक घटकांनी समृद्ध असल्याने भविष्यातील महत्त्वाचे पीक ठरू शकते, असा विश्वास डॉ. चाळासाहेव सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला. पारंपरिक हिरव्या भेंडीनंतर आता लाल भेंडीच्या लागवडीकडे तालुक्यात कल वाढताना दिसत आहे.

Konkan red okra benefits
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जि. प. सेवेतील तीन कर्मचारी निलंबित
Summary
  • लाल भेंडीमध्ये अँटिऑक्सिडंटस्, लोह, फायबर आणि 'सी' जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते.

  • ही भाजी तारुण्य टिकवून ठेवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास अत्यंत प्रभावी ठरते.

  • हिख्या भेंडीच्या तुलनेत या वाणाला बाजारात जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.

  • पाण्याचा निचरा होणारी जमीन, सेंद्रिय खतांचा वापर आणि योग्य अंतरावरील लागवड दर्जेदार उत्पादनासाठी आवश्यक आहे.

विद्यापीठाच्या वाकवली प्रक्षेत्रात विविध भाज्यांवर संशोधन सुरू असून, त्यामध्ये लाल भेंडीने विशेष लक्ष वेधले आहे. प्रायोगिक तत्त्वावर घेतलेल्या पिकांमध्ये लाल भेंडी उत्पादन, गुणवत्ता आणि बाजारमूल्य या तिन्ही बाबतीत समाधानकारक ठरत असल्याचे दिसून आले आहे.

लाल भेंडी ही अँटिऑक्सिडंटस्, लोह, फायबर आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण ग्राहकांमध्ये तिची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. विशेषतः शहरी बाजारपेठ, सुपरमार्केट तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायात या भाजीला चांगली मागणी आहे. आकर्षक गडद लाल रंगामुळे ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. पारंपरिक हिरव्या भेंडीपेक्षा बाजारात तिचा दर काहीसा अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक फायदा होत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, लाल भेंडीची लागवड पद्धत साधारण हिरव्या भेंडीप्रमाणेच असली, तरी चांगला निचरा होणारी जमीन, सेंद्रिय खतांचा वापर, योग्य अंतरावर लागवड आणि वेळेवर कीडनियंत्रण केल्यास उत्पादन दर्जेदार मिळते.

कोकणातील दमट हवामान या पिकासाठी पोषक ठरत असून ४५ ते ५० दिवसांत पीक तयार होते. त्यामुळे अल्पावधीत उत्पन्न देणारे पीक म्हणून लाल भेंडीकडे पाहिले जात आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून लाल भेंडीची यशस्वी लागवड करण्यात आली असून पुढील हंगामात सुधारित वाणांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. मार्गदर्शन शिबिरे, प्रात्यक्षिके आणि तांत्रिक सल्ला यांद्वारे अधिकाधिक शेतकऱ्यांना या पिकाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

लाल भेंडीमुळे शेतकऱ्यांसमोर उत्पन्नाचे नवे दालन खुले होत असून स्थानिक बाजारपेठेसह निर्यातक्षम उत्पादनाच्या दृष्टीनेही या पिकाकडे आशेने पाहिले जात आहे. पारंपरिक पिकांना पर्याय देत कोकणातील शेती अधिक रंगतदार आणि लाभदायक करण्याच्या दिशेने लाल भेंडी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा आशावाद कृषी तज्ज्ञांत व्यक्त होत आहे. वाकवली प्रक्षेत्रात शुक्रवारी दि २० रोजी विविध फळभाज्यांची माहिती देताना डॉ. संतोष वरवडेकर, डॉ. सखाराम देसाई, डॉ. मंदार खानविलकर डॉ. संतोष मेसरे, डॉ. सतिषकुमार चव्हाण, डॉ. अरुण माने, डॉ. संदीप महाडिक, डॉ. योगेश परुळेकर, डॉ. प्रज्ञा गुडघे आदी उपस्थित होते.

Konkan red okra benefits
Mahashivratri festival : नेरूरचा जागृत श्री देव कलेश्वर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news