Sindhudurg News : सिंधुदुर्ग जि. प. सेवेतील तीन कर्मचारी निलंबित

कामात अनियमिता, बेशिस्त वर्तन प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई
Sindhudurg Zilla Parishad
Sindhudurg Zilla Parishad(Pudhari File Photo)
Published on
Updated on

ओरोस ः कामचुकार आणि कामात अनियमिता करणारे कर्मचारी, अधिकारी यांच्याविरोधात जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या अंतर्गत सोमवारी 3 कर्मचाऱ्यांवर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या कारणाखाली निलंबनाची कारवाई केली.

जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे काम अनियमित व गैरप्रकारे होत असल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून होत आहेत. प्रशासनाची शिस्त न पाळणे, नागरिकांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवणे, आर्थिक गैरकारभार यासह अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत. यासाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी अशा कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली असून कारभारात गंभीर चुका आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाचे अस्त्र उगारले आहे.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी 3 कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले. यामध्ये संदीप जाधव (कनिष्ठ सहायक, प्रा.आ.केंद्र, पणदूर) यांना वारंवार गैरहजर, कामातील अनियमितता या प्रकरणी निलंबीत करण्यात आले. संजय चौकेकर (सहा.प्रशासन अधिकारी, महिला व बाल विकास कार्यालय, सिंधुदुर्ग) यांना जिल्हा वार्षिक योजना राबविणे कामात अनियमितता असल्या प्रकरणी निलंबीत करण्यात आले. निंगप्पा नागोजी नाईक (ग्रामपंचायत अधिकारी, ग्रा.पं. ओटवणे, ता. सावंतवाडी) यांना हे ग्रा.पं. घोडगे, ता. दोडामार्ग येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना माहिती अधिकार अंतर्गत योग्य माहिती न देण, बदली झालेनंतर कार्यभार हस्तांतरीत न करणे, या प्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जि. प. प्रशासनाच्या रडावर असे आणखी काही कर्मचारी असन या कारवाई सत्रामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news