Konkan Railway | सुरत-मंगळुरू स्पेशल एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार

Konkan Railway | कोकण रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा
Konkan Railway
Konkan Railway Pudhari Photo
Published on
Updated on

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि सातत्यपूर्ण मागणी लक्षात घेऊन सुरत - मंगळुरू जंक्शन सुरत विशेष भाड्याची स्पेशल ट्रेन (०९०५७ /०९०५८) आता नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Konkan Railway
SSY योजना : मुलगी म्हणेल, "थँक्यू बाबा! आज हे खाते उघडा... २१ वर्षांची होताच मिळतील तब्बल ७२ लाख रुपये"

आता ही गाडी 'गाडी क्रमांक १२०५७ / १९०५८ सुरत मंगळुरू जंक्शन (द्वि-साप्ताहिक) एक्स्प्रेस' म्हणून कायमस्वरूपी धावणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांना जोडणाऱ्या कोकण किनारपट्टीवरील प्रवाशांचा, विशेषतः चाकरमान्यांचा प्रवास आता अधिक सुकर आणि निश्चित होणार आहे.

सुरत या नियमित गाड्यांच्या नवीन वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक १९०५७सुरत ते मंगळुरू जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस येत्या ३ जूनपासून दर बुधवारी आणि रविवारी सुरत स्थानकावरून रात्री १९:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५ वाजता मंगळुरू जंक्शन येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १९०५८ मंगळुरू जंक्शन ते सुरत द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस ४ जूनपासून दर गुरुवारी आणि सोमवारी मंगळुरू जंक्शनवरून रात्री २२:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २३:४५ वाजता सुरत स्थानकावर पोहोचेल. या नियमित सेवेमुळे प्रवाशांना आता ऐनवेळी होणाऱ्या नियोजनाच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी या एक्सप्रेसला कोकण रेल्वे मार्गावरील आणि पश्चिम रेल्वेवरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने उधना जंक्शन, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव जंक्शन, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबीका रोड बैंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल या स्थानकांचा समावेश आहे.

Konkan Railway
Nashik Division 11th Admission | नाशिक विभागात अकरावीच्या 17,910 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

कोकणातील बहुतांश प्रमुख स्थानकांवर या गाडीला थांबा मिळाल्याने स्थानिक प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या रेल्वे गाडीची रचना एकूण २० डब्यांची असणार असून, यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी २ टायर एसीचा १ डबा, ३ टायर एसीचे ७ डबे, स्लीपर क्लासचे ६ डबे, सर्वसामान्यांसाठी जनरल क्लासचे ४ डबे आणि दोन एसएलआर डब्यांचा समावेश असेल.

प्रवाशांनी या नवीन नियमित रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. तसेच गाड्यांच्या अधिकृत आणि सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा कोकण रेल्वेचे अधिकृत 'KR Mirror' मोबाईल अॅप डाऊनलोड करावे, असेही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news