SSY योजना : मुलगी म्हणेल, "थँक्यू बाबा! आज हे खाते उघडा... २१ वर्षांची होताच मिळतील तब्बल ७२ लाख रुपये"

या योजनेत गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर दिला जातो.
SSY योजना
SSY योजना : मुलगी म्हणेल, "थँक्यू बाबा! आज हे खाते उघडा... २१ वर्षांची होताच मिळतील तब्बल ७२ लाख रुपये"file photo
Published on
Updated on

sukanya samriddhi yojana post office ssy scheme girl child get 72 lakh rupee at age 21 know benefits

पुढारी ऑनलाईन : मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana - SSY) ही सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. पोस्ट ऑफिसमार्फत चालवली जाणारी ही दीर्घकालीन बचत योजना मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता कमी करण्यास मदत करते. या योजनेत गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर दिला जातो.

SSY योजना
Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेद्वारे सोलापूर जिल्ह्यातील 15 हजार मुली होणार लखपती

शून्य जोखीम, आकर्षक व्याज

सुकन्या समृद्धी योजना २०१५ मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना खास मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही सरकारी योजना असल्याने गुंतवणुकीची पूर्ण सुरक्षितता सरकारकडून दिली जाते. सध्या या योजनेवर ८.२ टक्के वार्षिक व्याजदर मिळतो.

फक्त २५० रुपयांत खाते उघडा

या योजनेअंतर्गत १० वर्षांखालील मुलीच्या नावाने तिच्या पालकांकडून खाते उघडता येते. खाते सुरू करण्यासाठी किमान २५० रुपये जमा करावे लागतात. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५० लाख रुपये गुंतवता येतात.

SSY योजना
Raigad news | लेक लाडकी योजनमुळे मुलींच्या शिक्षणास चालना

२१ वर्षांची मुदत, पण गुंतवणूक फक्त १५ वर्षे

सुकन्या समृद्धी योजनेची मुदत २१ वर्षांची आहे. मात्र पालकांना केवळ पहिल्या १५ वर्षांपर्यंतच गुंतवणूक करावी लागते. उर्वरित ६ वर्षे कोणतीही रक्कम जमा न करता खाते सुरू राहते आणि त्यावर व्याज मिळत राहते.

७२ लाख रुपयांचा निधी कसा तयार होईल?

जर तुम्ही मुलीच्या नावाने खाते उघडून दरमहा १२,५०० रुपये म्हणजेच वर्षाला १.५० लाख रुपये जमा केले, तर १५ वर्षांत एकूण २२.५० लाख रुपये गुंतवले जातील.

८.२ टक्के व्याजदरानुसार, मुलगी २१ वर्षांची झाल्यावर खात्याची मुदत पूर्ण होईल आणि तिला अंदाजे ७१,८२,११९ रुपये मिळतील. यामध्ये सुमारे ४९,३२,११९ रुपये हे केवळ व्याजाचे उत्पन्न असेल.

करसवलतीचाही लाभ

या योजनेत गुंतवलेली रक्कम आयकर कलम 80C अंतर्गत करसवलतीस पात्र ठरते. पूर्वी दोन मुलींपर्यंतच हा लाभ उपलब्ध होता. मात्र आता एका मुलीनंतर जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांच्या खात्यांनाही करसवलतीचा लाभ मिळू शकतो.

हे खाते जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडता येते. रक्कम रोख, धनादेश (Cheque), डिमांड ड्राफ्ट किंवा बँकेने मान्य केलेल्या इतर पद्धतींनी जमा करता येते.

शिक्षणासाठी पैसे काढण्याची सुविधा

या योजनेची मुदत २१ वर्षांची असली तरी मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा आहे. मात्र एकूण शिल्लक रकमेपैकी कमाल ५० टक्के रक्कमच काढता येते.

यासाठी मुलीच्या शिक्षणाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ही रक्कम एकरकमी किंवा हप्त्यांमध्येही मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news