
कणकवली : कणकवली शहरात वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे गणपती साना परिसरातील चौंडेश्वरी मंदिर नजीक नयन सुतार यांच्या घरावर झाडाची मोठी फांदी पडल्याने सिमेंटचे पत्रे फुटून नुकसान झाले.
तसेच घराच्या बाहेर लावलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. नगरपंचायतीच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.
लोकाच्या कर्मचार्यांसह तेथील उपस्थित नागरिकांनी घरावर पडलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला केल्या. या घटनेमुळे सुतार कुटुंबियांचे नुकसान झाले आहे.