

मालवण : तालुक्यातील कर्ली खाडीतून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणार्या चार डंपर चालकावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत सुमारे 2 कोटी 20 हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद पीटर लोबो यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे.
शुक्रवारी सायंकाळी निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, संजय गांधी नायब तहसीलदार प्रिया हर्णे, मडळ अधिकारी पीटर लोबो, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र तारी आणि भरत शिंगनाथ याचे पथक देवली बोवलेकरवाडी जंटी खारबांध मार्गावर गस्त घालत होते त्यावेळी त्याना चार डंपर क्रमांक जीए 04 टी 1867, जीए 09 यू 4707, जीए 05 टी 6130 आणि जीए 04 टी 2278 संशयास्पदरीत्या जाताना दिसले.
पथकाने त्यांना थाबण्याचा इशारा केला, मात्र ते न थांबता पुढे निघून गेले सुमारे 100 मीटर अंतर पुढे गेल्यावर ते थांबले. यातील दोन डपर क्रमाक जीए 04 टी 1867 आणि जीए 09 यू 4707 चालकानी डपरमधील वाळू रस्त्यावर ओतून टाकली तपासणी केली असता ही वाळू सुमारे 5 ब्रास असल्याचे आढळले तर, उर्वरित दोन डपर क्रमांक जीए 05 टो 6130 आणि जीए 04 टी 2278 रिकामे होते.
या प्रकरणी प्रथमेश बाळकृष्ण गावडे (25, रा. माड्याचीवाडी ता.कुडाळ), गौरव अरुण नाईक (30, रा. रागणा तुळसुली ता. कुडाळ), शेखर संतोष राठोड (42, रा. गुढीपूर पिंगुळी, ता. कुडाळ) आणि शंकर सुरेश भितये (30, रा. गोठोस, ता. कुडाळ) या चार डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे चालक शासनाची कोणतीही परवानगी नसताना वाळूची चोरी करून ती घेऊन जात असताना पकडले गेले. या चारही डपरची किंमत सुमारे 2 कोटी 20 हजार रुपये असून ते जप्त करण्यात आले आहेत मंडळ अधिकारी पीटर लोबो यानी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसानी चारही डंपर चालकांवर गुन्हा दाखल केला आहेतहसीलदार वर्षा झालटे यांनी कर्ली व कालावल खाडीतील अनधिकृत बोटींवर मेरीटाईम बोर्डाने कारवाई करणे आवश्यक आहे. याबाबत आदेश देऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही असे स्पष्ट केले.