Malvan News | राड्याप्रकरणी दोन्ही गटांतील १५० जणांविरोधात गुन्हे दाखल

४२ जणांची नावे निश्चित : अन्य संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू
Malvan News
राड्याप्रकरणी दोन्ही गटांतील १५० जणांविरोधात गुन्हे दाखल Pudhari
Published on
Updated on

मालवण : राजकोट येथे बुधवारी झालेल्या राड्याप्रकरणी मालवण पोलिसांनी भारतीय जनता पार्टी व ठाकरे गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

राजकोट किल्ला येथील कोसळलेल्या पुतळ्याच्या पाहणीदरम्यान बुधवारी दुपारी राणे समर्थक व ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यात संभाजी पाटील, मेहेक परब हे पोलिस कर्मचारीही जखमी झाले. त्याचबरोबर अनेक कार्यकर्तेही जखमी झाले. त्यामुळे या राड्याप्रकरणी गर्दी, मारामारी, घोषणाबाजी, शासकीय कामात अडथळा, लोकसेवकांना त्यांच्या कामात धाक दाखवून परावृत्त करणे, दुखापत करणे, जिल्ह्यात सुरू असलेल्या मनाई आदेशाचा भंग करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, अशा विविध कलमानुसार दोन्ही गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस. एस. खाडे हे अधिक तपास करत आहेत. दरम्यान, हा राडा जेव्हा सुरू झाला तेव्हापासून तो संपेपर्यंत अनेक कॅमेरे चालू होते. महाराष्ट्रातील सर्व वाहिन्यांवर हा राडा लाईव्ह दाखवण्यात येत होता. त्यामुळे ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, अशा सर्वांची नावे निश्चित करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news