malavan news
मालवण येथील मच्छीमारांनी मालवण मत्स्य कार्यालयावर धडक दिलीpudhari

Malvan News | संतप्त मच्छीमारांकडून कायदा हातात घेण्याचा इशारा !

मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसल्याचा मच्छीमारांचा आरोप
Published on

मालवण : मालवण किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड एलईडी ट्रॉलरचा धुमाकूळ सुरू आहे. बुल ट्रॉलिंग पद्धतीने मत्स्यसंपदेची लूट करताना स्थानिक मच्छीमारांच्या बोटींवर चाल करून येताना समुद्रात टाकलेल्या जाळयांचे मोठे नुकसान हे शेकडोच्या संख्येने येणारे ट्रॉलर करत आहेत. मच्छीमारांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, मत्स्य विभाग कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याने संतप्त मच्छीमारांनी कायदा हातात घेण्याचा इशारा दिला आहे.

मालवण येथील मच्छीमारांनी येथील मत्स्य कार्यालयावर धडक दिली. मात्र, याठिकाणी वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने मच्छीमारांनी मत्स्य कार्यालयाबाहेर आपल्या संतात भावना मात्र, ती अद्याप आलेली नाही. तोपर्यंत मत्स्यसंपदेची लूट हायस्पीड ट्रॉलरकडून सुरू आहे. दुसरीकडे ड्रोन व्यक्त केल्या. मत्स्य विभागाची जुनी गस्ती नौका वेग मर्यादा पाहता कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. नवीन हायस्पीड गस्ती नौका येणार, असे सांगितले जाते. कॅमेरा माध्यमातून अनधिकृत मासेमारीवर लक्ष ठेवणार असे प्रशासनाने सांगितले होते. त्याबाबतही कार्यवाही झालेली नाही. स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यात काही दिवस मासे मिळत होते; मात्र शेकडोच्या संख्येने मालवण किनारपट्टी भागात दाखल होणारे हायस्पीड ट्रॉलर मासे लुटून नेत असल्याने स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यात मासेच मिळत नसल्याचे चित्र आहे.

मत्स्य विभागाने या हायस्पीड मासेमारी ट्रॉलरवर कारवाई करावी. मालवण सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात त्यांची होणारी घुसखोरी थांबवावी; अन्यथा मच्छीमार कायदा हातात घेतील, असा संतप्त इशारा मच्छीमारांनी दिला आहे.

जगदीश खराडे, मिथुन मालंडकर, भाऊ मोर्जे, जयदेव लोणे, आबा वाघ, सुजीत मोंडकर, बबलु मोडकर, संघर्ष कोयंडे, आर्यन मालंडकर, अन्वय प्रभु, राजू परब, अमीत कांदळगावकर, राका रोगे, राजेश कांदळगावकर, महादेव केळुसकर, जिवन भगत, हेमंत मोंडकर, बाबुष डीसोजा, राजा खवणेकर, प्रशांत तोडणकर, विष्णू मालंडकर यांसह अन्य मच्छीमार उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news