

कणकवली : कणकवली पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास खारेपाटण चेकपोस्टवर टेम्पोमधून वाहतूक केली जाणारी गोवा बनावटीची तब्बल ४८ लाख रुपयांची दारू जप्त केली. आयशर टेम्पोसहित तब्बल ६८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक व क्लिनर या दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारेपाटण चेकपोस्टवर शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास वाहनांची नियमित तपासणी सुरू होती. याच वेळी तेथे आलेल्या एका टेम्पोची तपासणी करता कॉन्स्टेबल सुनील निकम यांना टेम्पोमधील माल संशयास्पद वाटला. याबाबतची माहिती त्यांनी खारेपाटण दूरक्षेत्राचे अंमलदार मिलिंद देसाई यांना दिली. देसाई यांनी मालाची तपासणी कली असता पशुखाद्याच्या गोण्यांमागे गोवा दारूचा साठा असल्याचे निदर्शनास आले.
गोवा दारूचे १ हजार बॉक्स आढळले
या टेम्पोमधून सुमारे ४८ लाख रुपये किमतीचे गोवा दारूचे १ हजार बॉक्स आढळून आले.