Goa Liquor Seizure | गोवा दारु, कारसह 10 लाख 92 हजाराचा मुद्देमाल केला जप्त!

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई
Goa Liquor Seizure
झाराप : जप्त केलेली दारू, कार व संशयितांसोबत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड व पथकातील अन्य कर्मचारी.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कुडाळ : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखे (सिंधुदुर्ग) च्या पथकाने मुंबई- गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे छापा टाकून गोवा बनावटीची दारूची अवैध वाहतूक करणार्‍या दोन कार पकडल्या. यात 8 लाख रुपये किमतीच्या हुंडाई आय ट्वेन्टी कार व मारुती स्विफ्ट कार तसेच 2 लाख 92 हजार 800 रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू मिळून एकूण 10 लाख 92 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. दोन्ही कार जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी नासिर इक्बाल राजगुरु (40, रा. सावंतवाडी - सालईवाडा ), अनंत अरुण मेस्त्री (33, रा.सावंतवाडी खासकीलवाडा), शांताराम विष्णू कावले (48, रा. सावंतवाडी - माठेवाडा ) व ओंकार इंद्रजित सावंत (27, रा. ओरोस ) या चार संशयिताना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. या चौघांना कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या घटनेची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे हवालदार विल्सन झुजे डिसोझा यांनी कुडाळ पालिस ठाण्यात दिली. स्थानिक गुन्हा शाखेचे उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी उपविभागात पेट्रोलिंग सुरु होते. मुंबई- गोवा महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती या शाखेला मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार पेट्रोलिंग करणार्‍या या शाखेच्या पथकातील उपनिरीक्षक श्री. भोसले यांच्यासह सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड,पोलिस हवालदार प्रकाश कदम, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, महेश्वर समजीसकर यांनी मुुंबई-गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास सापळा रचला.

Goa Liquor Seizure
Kudal Record Rain | कुडाळ तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस

पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून ओरोस - कुडाळच्या दिशेने जाणार्‍या हुंडाई आय ट्वेन्टी व मारुती स्विफ्ट या दोन कार थांबविल्या. कार मध्ये पुठ्ठ्याच्या खोक्यामध्ये काय आहे, अशी विचारणा कार चालकाना केली असता,त्यांनी विसंगत माहिती दिली. त्यांच्याकडे अधिक विचारणा केली असता, गोवा बनावटीच्या दारुनी भरलेल्या बॉटल्स असल्याचे सांगितले. त्या कारची तपासणी केली असता दोन्ही कारमध्ये गोवा बनावटीची दारू सापडली. कार मधील नासिर राजगुरु , अनंत मेस्त्री व शांताराम कावले (सर्व रा. सावंतवाडी) या तिघांना ताब्यात घेतले. 5 लाख रु किमतीची हुंडाई आय ट्वेंटी कार व 3 लाख रु किंमतीची मारुती स्विफ्ट कार जप्त केली. मॅकडॉल 3 खोके, एसीई फाईन 7 खोके, मॅकडॉल 2 खोके, एसीई 41खोके, रम 2 खोके मिळून 2 लाख 92 हजार रु. किंमतीची गोवा बनावटीची दारू असा एकूण 10 लाख 92 हजार 800 रु.चा मुद्देमाल जप्त केला.

Goa Liquor Seizure
Kudal Pat Road Accident | कुडाळ-पाट मार्गावर कारला अपघात; युवक ठार

तसेच ओंकार सावंत ( रा. ओरोस ) याच्या सांगण्यावरून ही दारू पत्रादेवी - गोवा येथून ओरोस येथे घेऊन जात असल्याचे संशयितांनी चौकशी दरम्यान सांगितले. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ओंकार सावंत याला ओरोस येथून ताब्यात घेतले. सदर चारही आरोपींसह मुद्देमाल कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. कुडाळ पोलिसांनी चारही संशयितावर गुन्हा दाखल केला. तपास कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गुरूदास पाडावे करीत आहेत, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news