

कुडाळ : कुडाळ-पाट मार्गावर करमळगाळू येथे मंगळवारी रात्री 10.30 वा. च्या सुमारास इर्टिगा कारचा अपघात होऊन यामध्ये रोहन ऊर्फ अक्षय आत्माराम सावंत (वय 18) या युवकाचा जागीचा मृत्यू झाला. तर कारचालक चंद्रकांत सुरेंद्र परूळेकर (32, रा. परुळे-कुशेवाडा) हा सुदैवाने बचावला. तो किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातप्रकरणी चालकावर निवती पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
गावच्या दिशेने जात होती. या कारमध्ये दोघे चालक चंद्रकांत परूळेकर व अक्षय सावंत असे दोघे होते. करमळगाळू येथे चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार गटारात जाऊन धडकली. यात अक्षय सावंत याच्या डोकीला मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच अपघातात कारचा चक्काचूर झाला.
या प्रकरणी कोचरा येथील दत्ताराम राणे यांनी पोलिसात फिर्याद दिली. या अपघात प्रकरणी स्वतःला किरकोळ दुखापत आणि रोहन याच्या मृत्यूस कारणीभूत धरून निवती पोलीस ठाण्यात चालक चंद्रकांत परूळेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेट्ये अधिक तपास करीत आहेत..