Elephant Damage Ghotge Area | घोटगे परिसरात हत्तींकडून नुकसान सुरूच

वनपाल, वनरक्षक, हाकारी यांचा हलगर्जीपणा; उपवनसंरक्षकांकडे तक्रार
Elephant Damage Ghotge Area
घोटगे येथे अशाप्रकारे रानटी हत्तींकडून नुकसानी सुरूच आहे. (Pudhari File Photo)
Published on
Updated on

दोडामार्ग : हत्ती प्रवण क्षेत्रात कार्यरत वनपाल, वनरक्षक व हाकारी हे कामात हलगर्जीपणा करत असल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत चौकशी करून आपल्या स्तरावर कारवाई करावी, अशी मागणी संतोषकुमार दळवी यांनी लेखी निवेदनाद्वारे उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्याकडे केली आहे. तसे पत्र देखील त्यांनी दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे, माझी शेती वायंगणतड येथे आहे. गेली तीन चार वर्ष गाव मौजे घोटगे पानशीचा डोंगर येथे बागायती मध्ये नारळाची झाडे, बांबूची बेटे, बागायतीच्या सभोवताली असलेले सौरऊर्जेचे कुंपण याचे जंगली हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालले आहे. मात्र, झालेल्या नुकसानीची वन कर्मचार्‍यांनी पंचनामे केलेले नाहीत. किंबहुना कोणतीच दखल घेतली नाही. 4 सप्टेंबर च्या मध्यरात्री पुन्हा जंगली हत्तींनी वायंगणतड येथे मोठया प्रमाणात नुकसान कले. या नुकसानीच्या वेळी वन कमचारी हजार नव्हते. त्यांना त्या वेळचे हत्तींचे लोकेशनही मिळाले नव्हते. हत्तींचा फिरण्याचा मार्ग सोडून वनविभागाचे कर्मचारी दोन किलोमीटर अंतरावर गस्त घालत होते. हाकारी व कर्मचारी यांनी नुकसान झालेल्या जागी गस्त घातली असती तर नुकसान झालेच नसते.

Elephant Damage Ghotge Area
Dodamarg News | गोव्यातील अ‍ॅसिड हल्ल्याचे दोडामार्ग कनेक्शन

हत्ती घोटगेवाडी गावाच्या हद्दीत प्रवेश करताना ज्या मार्गाने येतात त्याची जाणीव झाली तरी वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत नाहीत. कालव्याच्या कठड्यावर बसून टिंगल टवाळी करणे असले प्रकार वनकर्मचार्‍यांचे चालू असतात. किंबहुना हाकारी व वनरक्षक घटनास्थली वेळत पोहोचत नाहीत. कृषी, महसुल व वनकर्मचारी यांनी पंचनामा समक्ष करून नुकसान भरपाई देण्याचे असताना कार्यरत वनसंरक्षक एकटेच आपल्या मर्जीप्रमाणे बेकायदेशीर पंचनामे करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत. वनपाल वनविभागीय गस्तसाठी दिलेल्या यंत्रसामुग्री, वाहनाचा व मनुष्यबळाचा गैरवापर करीत आहेत. नागरीकांना हत्ती पासून त्रास होऊ नये, शेती बागायतींचे नुकसान होऊ नये म्हणून शासनामार्फत वनविभागाला पुरविलेली यंत्रसामुग्री, वाहने इत्यादींचा गैरवापर होत आहे.

Elephant Damage Ghotge Area
Dodamarg Rain News | दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस

गस्तीच्या वेळी मदत व्हावी म्हणुन मौक्याच्या ठिकाणी वनविभागाच्या वतीने मंजूर झालेले सौरउर्जेवरील पथदिप बसविणे आवश्यक होते. परंतु वनअधिकारी यांच्या बेजबाबदारपणामुळे चुकीच्या जागेवर ते बसविण्यात आले. रात्रीच्या वेळी शेतकयांना शेती बागायतीत फिरताना त्रास होवु नये म्हणुन वन विभागामार्फत देण्यान आलेल्या बॅटरी शेतकर्‍यांना पोहोचल्या नाहीत. जंगली हत्तीचे गुगल लोकेशन समजल्यास नागरिकांना सतर्क राहता येते. शेती बागायतींचे होणारे नुकसान टाळता येते. मात्र ज्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे तेच बेजबाबदार वागत असतील तर कुंपणच शेत खात आहे. याबाबत गंभीर दखल घेत चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी श्री. दळवी यांनी उपवनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news