Illegal Liquor | दोडामार्ग तालुका अवैध दारू वाहतुकीसाठी ‘नंदनवन’!

पोलिसांच्या भूमिकेबाबत साशंकता; साटेली-भेडशी बाजारपेठेत गोवा दारूची खुलेआम विक्री
Illegal Liquor
Illegal Liquor (File Photo)
Published on
Updated on

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात गोवा दारूच्या अवैध वाहतुकीचे जाळे दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. यामुळे संपूर्ण तालुका अवैध दारू माफियांसाठी नंदनवन बनू लागला आहे. गोवा आणि कर्नाटक राज्य सीमेलगत असलेल्या या तालुक्यातून दारू वाहतूक सर्रास होत असून, यावर कारवाई होत नसल्याने पोलिस यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलिस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांमधून केला जात आहे.

गोवा राज्य दोडामार्गला लागून असल्याने तेथील स्वस्त आणि सहज उपलब्ध असणारी दारू मोठ्या प्रमाणावर दोडामार्ग मार्गे कर्नाटक व कोल्हापूरकडे नेली जाते. शिवाय दोडामार्ग तालुक्यातही ही गोवा दारू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येते. त्यासाठी खास नेटवर्क तयार करण्यात आले आहे. या अवैध धंद्यामुळे दोडामार्ग तालुका ‘गोवा दारू वाहतुकीचे हब’ बनू लागल्याचे चित्र आहे. यात स्थानिकांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. विशेषतः तालुक्यातील साटेली-भेडशी ही बाजारपेठ दारू विक्रीचे प्रमुख केंद्र बनली असून येथे दिवसा ढवळ्या खुलेआम गोवा दारूची विक्री होताना दिसून येते. पोलिसांच्या गस्त असताना ही खुलेआम दारू विक्री कशी सुरू असते? असा प्रश्न विचारला जात आहे.

Illegal Liquor
Dodamarg landslide | कसईनाथचा काही भाग कोसळला

ही दारू वाहतूक रात्रीच्या वेळी होते. मात्र, वीजघर येथील तपासणी नाका किंवा दोडामार्ग-गोवा आंतराज्यसीमेवरील तपासणी नाक्यावर पोलिसांना ही दारू सापडत कशी नाही? असा सवालही निर्माण होत आहे. पोलिस गांधारीच्या भूमिकेत आहेत का? की दारू वाहतूक करणारे पोलिसांच्या नाकावर टिच्चून दारू वाहतूक करतात? असे अनेक सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित केले जात आहेत.

तालुक्यात गुन्हेगारी वाढीची शक्यता!

दारू माफियांनी तालुक्यात आपल्या नेटवर्कचा प्रचंड विस्तार केला आहे. हे नेटवर्क वेळेत नष्ट न केल्यास तालुक्यात गुन्हेगारी फोफावण्याची भीती आहे. स्थानिकांनी या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन देण्याची तयारी दर्शवली आहे. गोवा दारूची अवैध वाहतूक व विक्री थांबवून दारू माफियांचे जाळे उद्ध्वस्त करावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

Illegal Liquor
Dodamarg Rural Development Scheme| केर -भेकुर्ली गावातील 122 कुटुंबांना ‘बंब’ वाटप!

स्थानिकांकडून होते दिशादर्शन

दारू वाहतूक करण्यात काही स्थानिकांचा हात असल्याची चर्चा आहे. ही वाहतूक करण्यापूर्वी ते सर्व मॅनेज करतात. यातील काहीजण पोलिस ठाण्याची रेकी करतात, तर काहीजण रस्त्यावर पोलिस बंदोबस्त नाही ना याची खातरजमा करतात. त्यानंतर या दारूची वाहतूक केली जाते, अशा चर्चा आहे. जरी असे असले तरी दोडामार्ग पोलिस ठाणे, त्यानंतर तिलारी पोलिस दूरक्षेत्र व वीजघर येथील तपासणी नाका, अश्या तीन स्तरातूनही ही दारू निसटते कशी? हे मात्र न उलगडणारे कोडे बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news