Nagar Panchayat Meeting | स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून खडाजंगी!

Nagar Panchayat Meeting | देवगड-जामसंडे न. पं. सर्वसाधारण सभेत समुद्रकिनारा स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून जोरदार चर्चा झाली.
Nagar Panchayat Meeting
Nagar Panchayat Meeting
Published on: 
Updated on: 
Summary
  • कॅशबुकच्या झेरॉक्स प्रती न दिल्याने नगरसेविका प्रणाली माने आक्रमक

  • पाणीटंचाई, डेंग्यू आणि अतिक्रमणच्या प्रश्नांवर लक्षवेधी चर्चा

देवगड : पुढारी वृत्तसेवा
देवगड-जामसंडे न. पं. सर्वसाधारण सभेत समुद्रकिनारा स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून जोरदार चर्चा झाली. नगरसेविका प्रणाली माने यांनी अभियानाच्या खर्चाचा लेखी हिसाब मागितला तो का दिला नाही? असा सवाल करत कॅशबुकच्या झेरॉक्स प्रती न दिलяबाबत आक्षेप घेतला. त्यावर मुख्याधिकारी हरिदत माने यांनी प्रशासनाकडून कोणतीही माहिती लपवली जात नसल्याचे स्पष्ट केले.

Nagar Panchayat Meeting
Devgad Worker Death | आंध्र प्रदेशातील कामगार देवगड बाजारपेठेत मृतावस्थेत आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट

या विषयावर सभागृहात बराच वेळ चर्चा रंगली. त्याचवेळी शहरातील अनियमित पाणीपुरवठा, आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई, डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येची चिंता, खुल्या जागावरील अतिक्रमण आणि स्वच्छता या प्रश्नांवरही सदस्यांनी प्रशासना का लक्ष वेधले. काही विकासकामांना मंजुरी देताना नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.
देवगड-जामसंडे न. पं. ची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष मिताली सावंत, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोरकर, स्वच्छता सभापती निवृत्ती तारी, मुख्याधिकारी हरिदत माने यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

१९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित समुद्रकिनारा स्वच्छता अभियानाच्या खर्चाचा मुद्दा सभेत चर्चेला आला. या अभियानाचा खर्च कशा पद्धतीने करण्यात आला, याचा लेखी हिसाब मागितलाही ना, असा सवाल प्रणाली माने यांनी केला. सदस्यांनी मागितलेल्या माहितीच्या झेरॉक्स प्रतीसाठी खर्च मागणे अन्यायकारक असल्याचे सांगत प्रशासनाने लोकप्रतिनिधींना शब्दांत गुंडाळण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कॅशबुक प्रति न देण्यामागे त्यातील घोटाळा कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छता अभियानासाठी १ लाख ३५ हजार रुपयांची जमा नोंद असून, त्यापैकी १ लाख २१ हजार १३० रुपये खर्च झाल्याचे स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांमधील खर्चाच्या मर्यादेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर प्रशासनाकडून ५ हजार रुपयांच्या आतील रक्कम खर्च करता येत असल्याचे सांगितले. प्रशासन कोणतीही माहिती लपवत नसल्याचे मुख्याधिकारी हरिदत माने यांनी स्पष्ट केले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहिबाव योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, उर्वरित पाइपलाइनचे काम भूमिगत असल्याने पाणीपुरवठा अनियमित होत असल्याचे पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोरकर यांनी सांगितले. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला सभागृहाने सर्वानुमते मंजुरी दिली.

नगरपंचायतीच्या सुका कचरा विक्रीसंदर्भात 'मे. ओम साई स्क्रॅप रिसायकलिंग' तसेच नगरपंचायतीकडून मशीन भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. गोगटे हायस्कूल येथे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी आर्थिक निधी देण्याचा विषयही मांडण्यात आला. नितीन बांदेकर यांनी केवळ एका कार्यक्रमाला निधी दिल्यास अन्य शाळांवर अन्याय होऊ शकतो, अशी सूचना केली.

चर्चेनंतर संबंधित कार्यक्रमासाठी निधी देण्यास मंजुरी देण्यात आली.
देवगड-जामसंडे शहरात मच्छि मार्केट उभारण्यासाठी खालची बाजारपेठ येथील जुन्या भाजी मार्केटची जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मार्गो लोककल्याण अभियानांतर्गत आठवडा बाजार आणि निर्मिला देवी मंदिर परिसरात सुलभ शौचालये उभारणे, पर्यटकांसाठी बेंचीची व्यवस्था करणे आणि हायमास्ट दिवे बसविण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. नवीन शौचालये उभारण्याबरोबरच जुन्या शौचालयांच्या दुरुस्तीकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी चंद्रकांत कावले यांनी केली.

Nagar Panchayat Meeting
Sindhudurg News : देवगड तालुक्यात ३ कृषी औषध उत्पादने बाेगस

शहरातील अतिक्रमणांवर लवकरच कारवाई

शहरातील डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येचा मुद्दा नितीन बांदेकर यांनी उपस्थित केला. शहरातील खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणचा मुद्दा मांडत संतोष तारी यांनी प्रशासनाकांच्या कारवाईबाबत सवाल केला. मुख्याधिकारी हरिदत माने यांनी एका महिन्यात अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

नगरपंचायत क्षेत्रातील ग्रामीण रस्त्यांवर स्वच्छता नसल्याचे तसेच कर्मचारी दुपारनंतर प्रभागात फिरकत नसल्याचा आरोप चंद्रकांत कावले यांनी केला. यावर मुख्याधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे द्यावीत, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून उपस्थित प्रश्नापासून ते शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य, अतिक्रमण आणि विकासकामांपर्यंत विविध विषयांवर या समेत चर्चा झाली. काही मुद्द्यांवर सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला, तर काही प्रस्तावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. आद्या गुमास्ते, रूचाली पाटकर यांनीही विषय मांडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.