Sindhudurg News : देवगड तालुक्यात ३ कृषी औषध उत्पादने बाेगस

काका ढाेके यांचा खळबळजनक दावा
पत्रकारपरिषदेत बाेलताना काका ढाेके, गणेश गावकर, नीरज घाडी.
पत्रकारपरिषदेत बाेलताना काका ढाेके, गणेश गावकर, नीरज घाडी.
Published on: 
Updated on: 

देवगड : देवगड तालुक्यात कृषी विभागाने जुलै महिन्यात तालुक्यातील १३ औषध विक्रेत्यांकडून कृषी औषधांचे नमुने तपासणीसाठी घेतले हाेते.त्यातील ३ उत्पादनांचे नमूने बाेगस असल्याचे प्रयाेगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर अहवाल प्राप्त हाेणे व दाेष सिध्द झाल्यास नियमानुसार कारवाई करणे ही कृषी विभागाची जबाबदारी हाेती, मात्र अहवाल प्राप्त हाेवूनही कृषी विभागाकडून दाेषींवर कारवाई क रण्यात आली नाही.बाेगस औषधांमुळे शेतकऱ्यांना माेठ्या नुकसानीला सामाेरे जावे लागले, त्यामुळे या प्रकरणात केवळ विक्रेत्यांचीच नव्हे तर तपासणी व कारवाईसाठी जबाबदार अधिकाऱ्यांचीही चाैकशी व्हावी, अशी मागणी आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघाचे अध्यक्ष काका ढाेके यांनी पत्रकारपरिषदेत केली.

देवगड शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सायंकाळी आयाेजित पत्रकार परिषदेत काका ढाेके बाेलत हाेते. गणेश गावकर, नीरज घाडी आदी उपस्थित हाेते. काका ढाेके म्हणाले, कृषी विभागाने जुलै महिन्यात कृषी औषध विक्रेत्यांकडील उत्पादनांचे नमूने तपासणीसाठी घेतले हाेते. देवगड तालुक्यात ५९ परवानधारक कृषी औषध विक्रेते असून यातील १३ विक्रेत्यांकडून उत्पादनांचे नमूने घेण्यात आले हाेते.त्यातील ३ उत्पादनांचे नमुने बाेगस असल्याचे प्रयाेगशाळा अहवालातून स्पष्ट झाले. नमुना तपासणीसाठी पाठविल्यानंतर साधारणत ३० दिवसांनी अहवाल मिळणे अपेक्षित असते ताेपर्यंत ती औषध विक्री करावयाची नसते, मात्र औषध विक्रेत्यांनी नमुने घेतलेली औषधेही विक्री केली असून यामुळे शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेणार आहे. कृषी विभागाने संबंधित विक्रेत्यांवर काेणतीही कारवाई केली नाही. संघटनेने याबाबत कृषी विभागाकडे विचारणा केली असता हा विषय न्यायलयीन प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले. ही बाब गंभीर असून कृषी अधिकारी व विक्रेते संगनमत करून शेतकऱ्यांना लुटत असल्याचा आराेप काका ढाेके यांनी केला.येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी औषधे खरेदी करताना लॅब टेस्टींगसाठी गेले आहे का? याची खात्री करून औषधे खरेदी करावीत, असे आवाहन काका ढाेके यांनी केले.

संघाची सर्व आंदाेलने ही काेणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत.ही आंदाेलने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू आहेत.तरीही काही औषधविक्रेते किंवा त्यांच्याशी काही संबंधित व्यक्ती आंदाेलनाला धमकाविण्याची भाषा वापरत आहेत.जर काेणी आम्हाला धमकविण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी म्हणून आम्हीही रस्त्यावर उतरून त्याचा भाषेत उत्तर देवू. जे बाेगस विक्रेते सत्यतेच्या आड लपण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांनाही याेग्य वेळी उत्तर दिले जाईल असा इशारा श्री. ढाेके यांनी दिला.

गणेश गावकर म्हणाले, शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईपाेटी मिळालेली तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करताना कृषी सहाय्यक व कृषी सेवकांनी किती मलिदा जमा केला याचे पुरावे संघटनेकडे आहेत. याबाबतचा तळेबाजारमधील पुरावा आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना देवून संबंधित कृषी सेवकाला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. काही तलाठी व मंडल अधिकारीही शेतकऱ्यांना वेठीस धरत असून महसुल विभागाने लवकरात लवकर अशा लाेकांवर कारवाई करावी, अन्यथा आंबा- काजू बागायतदार व व्यापारी संघ शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी माेठे आंदाेलन उभे करेल, असा इशारा श्री. गावकर यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news