

Labourer Body Found In Devgad
देवगड : देवगड शहरातील बाजारपेठ परिसरात आंध्र प्रदेशातील जाळी विणण्याचे काम करणारा एक कामगार मृतावस्थेत आढळून आल्याची घटना समोर आली आहे. मुवाल्ला रामराव भाषा (वय ३१, रा. आंध्र प्रदेश) असे या कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू असून, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुवाल्ला रामराव भाषा हा ठेकेदारामार्फत जाळी विणण्याचे काम करत होता. त्याला नेमके कोणत्या ठेकेदाराकडे काम मिळाले होते, याची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
मुवाल्ला रामराव भाषा याने आपल्या गावी तो सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास निघाला होता. मात्र, पुढे तो देवगड शहरातील बाजारपेठ परिसरात मृतावस्थेत आढळून आला.
या कामगाराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, तो मृतावस्थेत कसा आढळला आणि या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.