

सावंतवाडी ः महायुती झाल्यास सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष पदावर शिवसेनेचा दावा कायम राहणार आहे, मात्र वेंगुर्ला नगराध्यक्ष पद भाजपला सोडण्यास आम्ही तयार आहोत, अशी भूमिका शिवसेनेचे नेते आ. दीपक केसरकर यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना मांडली. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही युतीसाठी आशावादी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सावंतवाडी नगरपरिषद पूर्वी शिवसेनेच्या ताब्यात होती, त्यामुळे नगराध्यक्ष पदावर शिवसेना आपला दावा कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आ. दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला नगराध्यक्ष पद भाजपसाठी सोडण्याची तयारी दर्शविली आहे. महायुती होण्यासाठी आजही आम्ही आग्रही आहोत आणि उद्यापर्यंत चर्चा करता येईल. उद्यापर्यंत चर्चा झाली नाही किंवा अंतिम निर्णय न झाल्यास शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार आहे.