Devgad News : पावसामुळे देवगडमध्ये घरे कोसळून ४ लाख ६० हजारांचे नुकसान

नुकसानग्रस्त भागाची देवगड तहसीलदार यांनी पाहणी
Citizens have become homeless due to damage to houses due to rain.
पावसामुळे घरांचे नुकसान झाल्याने नागरिक बेघर झाले आहेत.Pudhari photo
Published on
Updated on

देवगड, पुढारी वृत्तसेवा : देवगडमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीत ठिकठिकाणी घरांची पडझड होऊन सुमारे ४ लाख ६० हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मिठबाव येथे (शनिवारी दि.20) वडाच्या झाडाच्या फांद्या तुटून विद्युत वाहिनीवर कोसळल्याने विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला.

Citizens have become homeless due to damage to houses due to rain.
पावसाचा कहर: घरांची पडझड नि शेतीचेही नुकसान

अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान देवगड कट्टा येथे झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची देवगड तहसीलदार यांनी पाहणी केली. तालुक्यातील देवगड कट्टा येथील महेश शंकर बाबर यांच्या घरावर दरड कोसळून सुमारे 3 लाख 78 हजार रुपयांचे झाले. तर तेथीलच प्रशांत परशुराम दरवेश यांच्या घराची भिंत कोसळून 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यासहित चांदोशी येथील मनोहर धोंडू चांदोसकर यांच्या घर कोसळून सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले.

Citizens have become homeless due to damage to houses due to rain.
संगमनेर तालुक्यात पावसामुळे 18 घरांची झाली पडझड!

पाऊस आला धावून रस्ता गेला वाहून

किंजवडे-बाईटवाडी येथील दोन महिन्यापूर्वी बनविलेला रस्ता या मुसळधार अतिवृष्टीत वाहून गेला आहे. किंजवडे बाईतवाडी हा रस्ता व्हावा यासाठी गेली कित्येक वर्ष मागणी केली होती. मात्र यावर्षी रस्त्याचे काम पूर्ण झालं आणि पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news