पावसाचा कहर: घरांची पडझड नि शेतीचेही नुकसान

कर्जत तालुक्यात पावसाचा हाहाकार; बेनवडीत पूल वाहून गेला
Rain damage in Karjat taluka
कर्जत तालुक्यात पावसाचा हाहाकारपुढारी
Published on
Updated on

कर्जत : तालुक्यात सोमवारी (दि. 15) सायंकाळी व रात्री उशिरा झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला. ठिकठिकाणी घरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, या नुकसानीचे तलाठ्यांमार्फत पंचनामे करण्यात आल्याचे तहसीलदार गुरू बिराजदार यांनी सांगितले.

पहिल्याच पावसात पूल वाहून गेला

कर्जत शहर व तालुक्यात सोमवारी सायंकाळी व रात्री उशिरा जोरदार पाऊस झाला. शहराच्या आसपास व तालुक्यातील काही भागांमध्ये या पावसाने तळे, बंधारे, विहिरी भरल्या आहेत. मागील अनेक वर्षांत असा पाऊस झाला नव्हता, असे ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत. या पावसाने नुकसानदेखील मोठ्या प्रमाणात झाले. बेनवडी येथील खंडोबा वस्ती व गदादी वस्तीकडे जाणारा हरिनारायण स्वामी मंदिराच्या पाठीमागील पूल वाहून गेला. या वर्षीचा हा पहिलाच पाऊस असला तरी पुलाचे काम दर्जेदार नसल्यामुळे पहिल्याच पावसात पूल वाहून गेला आहे. मात्र नागरिकांचा रस्ता बंद झाला आहे.

शेतकऱ्याच्या घराची पडझड

तालुक्यातील कुळधरण येथील शेतकरी परसराम सुपेकर यांच्या घराची या पावसात पडझड झाली. त्यांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अन्नधान्य, कपडे व वस्तू पावसामध्ये भिजल्या. कानगुडवाडी येथील दादा अश्रू कानगुडे यांची दगडी बांधकाम असलेली विहीर या पावसाने ढासळली.

कर्जत-जामखेडमध्ये पुन्हा रामराज्य आणू | पुढारी

केळीचे पीक जमीनदोस्त

खेड येथील वर्षा दीपक मोरे या शेतकर्‍याच्या केळीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केळीची अनेक झाडे जमीनदोस्त झाली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याचप्रमाणे खेड येथीलच कैलास विनायक शिंदे यांच्या शेतातील शेडदेखील कोसळल्याने मोठे नुकसान झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news