

कणकवली : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील अग्रणी दैनिक असलेल्या दै. 'पुढारी'ची ८७ वर्षांची वाटचाल खरोखरच देदीप्यमान आणि कौतुकास्पद आहे. दै. 'पुढारी'ची एक वाचक म्हणून आणि प्रशासकीय अधिकारी म्हणूनही दै. 'पुढारी' परिवाराशी आपले चांगले अनुभव आहेत. कोणाला वैयक्तिक टार्गेट न करता जे योग्य आहे ते योग्य आणि जे चूक आहे ते चूकच अशी पत्रकारिता दै. 'पुढारी'ची आहे.
पुढारीची पत्रकारिता प्रगल्भ, निर्भीड आणि सकारात्मक अशी असून, महाराष्ट्रात एक वेगळी ओळख या दैनिकाने निर्माण केली आहे असे गौरवोद्गार सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढले. दै. 'पुढारी'चा ८७ वा वर्धापनदिन गुरुवारी कणकवली येथील जिल्हा कार्यालयात साजरा करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी तृप्ती धौडमिसे, सिंधुदुर्ग जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवीद्र खेबुडकर, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, राष्ट्रवादी (एसपी) चे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी (एसपी) कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, कणकवलीचे नगरसेवक सुसांत नाईक, जयेश धुमाळे, प्रांताधिकारी जगदीश काडकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, ज्येष्ट पत्रकार अशोक करंबळेकर, अॅड. उमेश सावंत, दै. पुढारीचे आवृत्तीप्रमुख गणेश जेठे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, दै. पुढारीचे वाचक, जाहिरातदार, हितचिंतक उपस्थित होते. है. पुढारी' चे संस्थापक संपादक डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलो जिल्हाधिकारी भी बोडमिसे म्हणाल्या, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.
गेल्या चार महिन्यांपासून आगण सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना कोकणातील पत्रकारिता वातावरण खूपच चांगले असल्याचे अनुभवले आहे. अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. अतिशय संयत आणि सकारात्मक पत्रकारिता इथे आहे. या जिल्ह्याच्या विकासाची आणि इथल्या जनतेच्या प्रश्नांची तळमळ इथल्या पत्रकारांच्या लेखनीतून आपल्याला पाहायला मिळते. वास्तबदर्शी बातम्या आणि संतुलित पत्रकारिता निवडणूक काळातही पाहायला मिळाली. जिल्ह्यातील पत्रकारांनी पत्रकारितेची चांगली प्रतिमा टिकवून ठेवली आहे. त्याचद्दल आपण सर्व पत्रकारांचे अभिनंदन करते, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या, गतिमान प्रशासनासाठी पत्रकारांची सजगता महत्त्वाची रवींद्र खेबुडकर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी प्रशासकीय सेवेतील अनुभव कथन करताना पत्रकारांच्या सजगतेचे महत्व अधोरेखित केले. ते म्हणाले, राजकारण व प्रशासन यांच्या नात्यात पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार काही घडू शकते अशी अनेक उदाहरणे मी पाहिली असून अनुभव घेतला आहे.
दै. पुढारीचे गणेश जेठे यांनी सुचवल्याप्रमाणे सिंधुदुर्गात प्लास्टिक कचरा संकलन मोहीम सुरू केली आहे. आज पत्रकार प्रशासनाचे डोळे असून ते प्रशासनाला नेहमीच जागृत करतात. पत्रकार आणि प्रशासनाचे चांगले सबंध असावे लागतात. गतिमान प्रशासनासाठी पत्रकारांची सजगताही महत्वाची आहे. समाजासमोर दै. पुढारी मांडत असलेली भूमिका पुढे नेऊन नवीन वर्षात पुढारीने मोठी झेप घ्यावी अशा शुभेच्छा दिल्या.
जनतेच्या मनात दै. पुढारीचे स्थान संदेश पारकर : कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, महाराष्ट्रात अग्रणी असलेल्या दै. पुढारीने पत्रकारीतेचा समर्थ वारसा जोपासतानाच देशात, राज्यात मोठे सामाजिक काम उभे केले आहे. दै. पुढारीने सीयाचीनमध्ये सैनिकांसाठी भव्य हॉस्पिटल उभारले. पुढारीचे मुख्य संपादक पक्षी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी महाराष्ट्रातही अनेक सामाजिक कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. एखादे वृत्तपत्र सूरू होते त्यावेळी वाचकांनी, लोकांनी ते स्वीकारले पाहीजे, त्यासाठी तशा पध्दतीने बातम्यांचे संकलन आणि विश्वासार्हता महत्वाची असते.
ती दै. पुढारीने निर्माण केली म्हणूनच पुढारी आज दै. पुढारी ८७ वर्षाची वाटचाल तेवढ्याच दिमाखात करत आहे. दै. पुढारीने आज जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या आजवरच्या राजकीय वाटचालीत दै. पुढारीचे सहकार्य आणि योगदान महत्वपूर्ण आहे. आम्ही सामान्य आहोत पण आम्हाला घडविण्याचे, पैलू पाडण्याचे काम वृत्तपत्रांनी केले, समाजाने केले. त्यामुळेच जनतेच्या प्रेमावर आणि आशिर्वादावर या जबाबदाऱ्या आम्ही पेलत आहोत. जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला न्याय देण्याचे काम निश्चितपणे केले जाईल. दै. पुढारीची दैदिप्यमान वाटचाल पुढे देखिल अशीच चालू राहील असा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केला. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, राजकीय जीवनात आपल्याला दै. पुढारीने मार्गदर्शकाचे काम केले आहे. निःपक्ष बातमी कशी घ्यावी, हे पुढारीकडून शिकावे व वस्तुनिष्ठ बातमी पुढारीत येते.
पुढारीच्या यशात निर्भिड पत्रकारीतेचे महत्व फार मोठे असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले. नगरसेवक सुशांत नाईक यानी दै. पुढारीने आम्हाला कायमच साथ दिली असून कणकवलीच्या राजकारणात, समाजकारणात काम करत असताना साथ देत मार्गदर्शन लाभले. आज पुढारीने वाचक वर्ग निर्माण केला असून डिजिटल युगात पुढारीने विश्वासार्हता जपल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी डिजिटल युगात भरारी घेण्याचे काम पुढारीने केले असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर यांनी पुढारीला शुभेच्छा दिल्या. वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी दै. पुढारीला दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमात पुढारी परिवाराच्यावतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, नगरसेवक सुशांत नाईक, जयेश धुमाळे यांचा सत्कार करण्यात आला. तर दै. पुढारीचे दोडामार्ग प्रतिनिधी ओम देसाई यांना उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार मिळाल्याबद्दल छायाचित्रकार अनिकेत उचले यांना कुडाळ तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. पुढारीने प्रकाशित केलेल्या आत्मनिर्भर भारत पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आवृत्तीप्रमुख गणेश जेठे यांनी तर सुत्रसंचालन कणकवली प्रतिनिधी अजित सावंत तर आभार प्रदर्शन कुडाळ प्रतिनिधी प्रमोद म्हाडगुत यांनी केले.
पालकमंत्री नितेश राणे यांचा दै. 'पुढारी'ला शुभ संदेश !
राज्याचे मत्स्य व्यवसाय व चंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे मांनी दै. 'पुढारी' च्या ८७ व्या वर्धापन दिनानिमित पुढारी परिवाराला शुभेच्छा देणारा शुभ संदेश पाठविला आहे. दै. 'पुढारी'ने मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या नावाने हा शुभेच्छा देणारा संदेश आहे. वा शुभ संदेशात मंत्री राणे म्हणतात, दैनिक 'पुढारी'ची स्थापना १ जानेवारी १९३९ रोजी पुरोगामी चळवळीचे आणि मानवतावादाचे खखंदे समर्थक स्वातंत्र्यसेनानी डॉ. गं. गो. जाधव यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीर नगरीमधून या दैनिकाची सुरुवात केली.
डॉ. ग. गो. जाधव महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सारख्या महापुरुषांचा विचाराचा पगडा त्यांच्यावर होता. या दैनिकांची पाऊण शतकाची वाटचाल पूर्ण करत ८७ वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात महाराष्ट्र, गोवा आणि बेळगांवमध्ये साजरा होत आहे. शिवाय महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव मध्ये दैनिक पुढारीची घोडदौड वेगाने सुरू आहे. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी लावलेले हे रोपटे त्यांचे सुपुत्र पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि नातू डॉ. योगेश जाधव यांनी या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले आहे.
या दैनिकाला तीन पिढ्यांचा इतिहास आहे, ही बाब निश्चितच वाखाणन्याजोगी आहे. राजकारण विरहीत पुढारी या दैनिकाचा महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा मोठा असून कोल्हापूर खंडपीठ आणि मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनात दैनिक पुढारीची भूमिका आघाडीची आणि अत्यंत महत्वाची राहिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि विकास, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळ यामध्ये दैनिक पुढारी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज रोजी ८७ व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या कडून दैनिक पुढारीच्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा!