Banda Monkey Fever News | बांद्यात माकडतापाची धास्ती! तपासणी मोहीम सुरू

Banda Monkey Fever News | राष्ट्रीय वैद्यकीय प्रयोग शाळेच्या विशेष पथकाकडून तपासणी
Banda Monkey Fever News
Banda Monkey Fever News
Published on
Updated on

बांदा : पुढारी वृत्तसेवा

बांदा-सटमटवाडी परिसरात माकडतापाचे रुग्ण तसेच मृत माकडे सापडल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून तपासणी मोहीम सुरू केली आहे. पुणे येथील राष्ट्रीय वैद्यकीय प्रयोग शाळेचे विशेष पथक गुरुवारी बांदा येथे दाखल झाले.

Banda Monkey Fever News
Water Crisis News| उन्हाची लाट अन् पाण्यासाठी पायपीट; नाशिक जिल्ह्यात 52 खासगी टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा

या पथकाने पूर्ण सुरक्षात्मक साधने (पीपीई किट) परिधान करून परिसरात तपासणी करत शेकडो गोचीड गोळा केल्या. या गोचीड पुढील तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्या असून, त्यांचा अहवाल आठ दिवसांनंतर प्राप्त होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून बांदा परिसरात मृत माकडे सापडण्याच्या घटना घडत आहेत.

तसेच, या भागात माकडतापाचे दोन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. विशेषतः, ज्या भागात मृत माकडे आढळली आहेत त्या परिसरात दूषित गोचीडींची शक्यता लक्षात घेऊन तपासणी करण्यात येत आहे.

पुणे येथून आलेल्या वैद्यकीय पथकाने दोन दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी मृत माकड सापडले होते त्या संपूर्ण परिसराची सखोल पाहणी केली. बुधवारी सायंकाळी उशिरा डिंगणे बांबरवाडी परिसरात आणखी एका मृत माकड सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

याची माहिती मिळताच वन विभाग व आरोग्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आवश्यक खबरदारी घेत मृत माकडाच्या अवशेषांची विल्हेवाट लावली. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जंगल परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करावेत.

Banda Monkey Fever News
Nashik Conversion Case: नाशिक 'TCS' धर्मांतर प्रकरणातील धक्कादायक Video समोर; हिंदू तरुणाला बीफ खाण्यासाठी, नमाज पठणासाठी भाग पाडले?

गोचीड चावल्याची लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. सध्या परिसरात आरोग्य विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत.

१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह

बांदा परिसरात माकडतापाच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले होते. यामध्ये सुमारे १८ जणांचे अहवाल प्रलंबित होते. दरम्यान, आता या सर्व नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्व निगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी खबरदारीच्या उपाययोजना सुरूच ठेवण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news