

Naseeruddin Shah Interview On Kanakavali
अनिकेत उचले
कणकवली : ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा व त्यांची पत्नीने एका चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत मुलाखतकार महिलेने तुम्हाला सर्वांत कोणते ठिकाण आवडते,असा प्रश्न केला असता त्यांनी आपल्या कणकवली हे ठिकाण आवडते असे उत्तर दिले. या मुलाखतीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर शहा हे कणकवलीच्या प्रेमात असल्याचे दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांनी हा व्हिडिओ व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचार्ट सहअन्य सोशल मीडिया फ्लॅटफार्मवर स्टेटस् म्हणून लावला आहे. सोशल मिडियावर या व्हिडिओचा दिवसभर बोलबाला असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
मुलाखतकार महिलेने नसरुद्दीन शहा यांच्या पत्नी यांना आपणास कोणते ठिकाण आवडते, असा प्रश्न केला असता त्यांनी आपणास बेंगलोर, चेन्नई ही शहरे आवडतात असे उत्तर दिले. हाच प्रश्न त्या महिलेने नसरुद्दीन शहा यांना केला असता.त्यांनी आपणास ‘कणकवली’ हे ठिकाण आवडत असल्याचे सांगतानाच वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आपण नाटक सादर केले होते. हे नाट्यमंदिर दगडांनी बांधलेले असून त्यावर लोखंडी पत्र्याचे छप्पर आहे, त्यात शामियाना लावलेला आहे.
अधूनमधून प्रकाश येतो, आतामध्ये प्रेक्षकांना बसता यावे, याकरिता प्लास्टिकच्या खुर्चा आहेत. नाटक पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक हे रात्रीचे जेवण करून नाटक पाहायला येतात, हे प्रेक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा कर्मचारी असतात. याशिवाय आयोजकांकडून नाट्य सुरू होण्याची घोषणा 8 वा.होते. मात्र, प्रत्यक्षात नाटक 9.30 वा. सुरू होता, असा किस्सा त्यांनी सांगितला.
या किस्साचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या व्हिडिओची सर्वत्र चर्चा आहे. जिल्हावासीयांसह कणकवलीकारांनी हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या फ्लॅटफॉर्मवर स्टेट्स म्हणून लावला आहे. नसरुद्दीन शहा यांच्या या व्हिडिओतून ते कोकणाच्या प्रेमात असल्याचे दिसून येते आहे. याचे गुपित म्हणजे आज जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्त त्यांनी केलेल्या नाटकाचा एक भाग म्हणून नसरुद्दीन यांनी निभावलेली अभिनेता म्हणून ची भूमिका हा योग जुळून आला. या निमित्ताने कणकवली शहराची एक वेगळी ओळख जगासमोर आली.