Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala: 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धेत मठ येथील शाळा प्रथम | पुढारी

Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala: 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धेत मठ येथील शाळा प्रथम

वेंगुर्ले, पुढारी वृत्तसेवा : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात मठ (ता. वेंगुर्ला) येथील प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. तर शिरोडा येथील गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालयाने माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक मिळविला. राज्यातील शाळा सुंदर बनाव्या, शाळेच्या भिंती बोलक्या व्हाव्यात, शाळेत अभिनव उपक्रम राबविले जावेत, मुलांना अभ्यास करताना आनंद मिळावा, या उद्देशाने शासनाने हे अभियान राबविले. Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala

या उपक्रमामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील १३२ प्राथमिक शाळांनी व २० माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. प्रथम केंद्रस्तरावर व नंतर तालुका स्तरावर मुल्यमापन करण्यात आले. यात प्राथमिक शाळांमध्ये तालुकास्तरावर मठ नं. २ येथील शाळेने प्रथम, वेतोरे नं. १ येथील शाळेने द्वितीय आणि मातोंड मिरिस्ते येथील शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला. Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala

इतर व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिरोडा येथील गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालयाने प्रथम, वेंगुर्ला हायस्कूलने द्वितीय आणि परुळे येथील अण्णासाहेब देसाई माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला. तालुका स्तरीय प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळांना प्रत्येकी ३, २, १ लाखांचे बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे.

या यशाबद्दल वेंगुले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

मठ येथील शाळेच्या यशाबद्दल सर्व आजी – माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापिका सुनिता पाडगावकर, सहकारी शिक्षिका ऋतिका राऊळ, सहकारी शिक्षक सिद्धेश्वर मुंडे, विषयतज्ञ शिवानी आळवे, स्वयंसेविका सुमिदा परब आदींचे सहकार्य लाभले.

हेही वाचा 

Back to top button