सिंधुदुर्ग : डिगस- सुर्वेवाडी परिसरात गव्यांचा धुमाकूळ; पिकांची नासधूस | पुढारी

सिंधुदुर्ग : डिगस- सुर्वेवाडी परिसरात गव्यांचा धुमाकूळ; पिकांची नासधूस

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यातील डिगस – सुर्वेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. या परिसरातील वायंगणी भातशेतीसह चवळी, मका, उडीद, कुळीथ, मिरची, भुईमूग या पिकांची गव्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी वर्गातून गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

गव्यांच्या कळपांनी शेतात थैमान घातल्याने डिगस – सुर्वेवाडी परिसरातील शेतकरी अशोक सुर्वे, संतोष कदम, सुरेश सुर्वे, प्रकाश सुर्वे यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या गव्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा, तसेच नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. डिगस – सुर्वेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी हुमरमळा (अणाव) भागातून पणदूर – घोडगे रस्ता पार करून गवे सुर्वेवाडी तसेच चोरगेवाडी धरण परिसरात दाखल झाले आहेत. येथेही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

हेही वाचा :

Back to top button