Sindhudurg Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू | पुढारी

Sindhudurg Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

ओरोस; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ हुमरमळा येथे आज सकाळी आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. महामार्गाच्या बाजूने सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या पादचाऱ्याला मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या भरधाव कारने ठोकरले. या भीषण अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. कालिदास झणझने असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

कालिदास हे मूळ सातारा जिल्ह्यातील असून ओरोस आरटीओ ऑफिसमध्ये क्लार्क पदावर कार्यरत होते. गोव्याच्या दिशेने जाणारी चारचाकी (Pb 65 AA/4411) ने कालिदास यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की ते जवळपास ५० फूट अंतरावर जावून आदळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

Back to top button