सिंधुदुर्ग: वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीला विशेष बहुमान प्राप्त | पुढारी

सिंधुदुर्ग: वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीला विशेष बहुमान प्राप्त

अजय गडेकर

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीला विशेष बहुमान प्राप्त झाला आहे. स्वच्छाग्राही म्हणून प्रेमा नारायण जाधव (रा. परुळे – गवाण) यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तसेच माजी सरपंच प्रदीप प्रभू हे खास निमंत्रित म्हणून दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी सहभागी झाले होते. परुळेबाजार ग्रामपंचायतला हा विशेष बहुमान मिळाला आहे.

प्रेमा जाधव या ग्रामपंचायत परुळेबाजार अंतर्गत स्वच्छाग्रही म्हणून काम करीत आहेत. ग्रामपंचायतच्या विविध स्वच्छता विषयक अभियानात त्या नेहमी अग्रेसर असतात. महिला बचत ‘स्वयंसहायता गटाच्या त्या सदस्या असून उमेद अभियानांतर्गत त्या स्वत : काम करतात. बँकेमार्फत काथ्या मशीन घेऊन काथ्यापासून पायपुसणी व इतर वस्तु त्या स्वत: तयार करतात. आणि बचत गट महोत्सवात स्टॉल लावून त्यांची विक्री करतात.  त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारतर्फे त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच माजी सरपंच प्रदीप प्रभूही खास निमंत्रित म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते .

या सर्वांची दखल घेऊन केंद्र सरकारतर्फे त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली. या बदल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रमात त्यांना संपूर्ण देशातून मंत्री महोदय समवेत व्यासपीठावर उपस्थित राहून आपले अनुभव कथन करण्याचा मान मिळाला. या बहुमानामुळे माझ्या सारख्या सर्वसामान्य महिलेला दिल्ली येथे उपस्थित राहण्याचा मान मिळाला, याबद्दल केंद्र सरकार चे आभार मानले.

हेही वाचा 

Back to top button