सिंधुदुर्ग : प्रभू श्रीराम नामाच्या जयघोषाने कुडाळ शहर राममय | पुढारी

सिंधुदुर्ग : प्रभू श्रीराम नामाच्या जयघोषाने कुडाळ शहर राममय

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळमधील समस्त रामभक्त आणि सिध्देश शिरसाट मित्रमंडळ कुडाळच्या वतीने रविवारी सायंकाळी शहरात प्रभू श्रीराम रथ यात्रा काढण्यात आली. हातात राम ध्वज आणि पताका घेऊन जय जय श्रीराम, अखंड हिंदू राष्ट्राचा विजय असो असा प्रभू श्रीराम नामाच्या जयघोषात, पालखी दर्शन, श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांची वेशभूषा साकारलेला चित्ररथ देखावा, शीला दर्शन घडवीत काढण्यात आलेली रथयात्रा लक्षवेधी ठरली. या रथयात्रेने शहर श्रीराममय झाले.

श्री रामलल्लाच्या पवित्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवार, 22 जानेवारी रोजी अयोध्येत होत आहे. यानिमित्त कुडाळमधील रामभक्त आणि सिध्देश शिरसाट मित्रमंडळ यांच्या वतीने या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जिजामाता चौक येथून या रथयात्रेला सुरूवात झाली. तेथून डिजेवर श्रीराम नामाचा जयघोष करीत फटाक्यांच्या आतषबाजीत गांधी चौक, मुख्य बाजारपेठ मार्गे हॉटेल गुलमोहर पर्यंत रथयात्रा काढण्यात आली. गुलमोहर हॉटेल नजीकच्या शहरातील पहिले श्रीराम मंदिर येथे या रथयात्रेची सांगता झाली.

रथयात्रेत माजी खा. नीलेश राणे, सिध्देश शिरसाट,ओंकार तेली, काका कुडाळकर, राजू राऊळ, बंटी तुळसकर, संजय वेंगुर्लेकर, आनंद शिरवलकर, विवेक पंडीत, रमाकांत नाईक, बंड्या सावंत, सौ. सिद्धी शिरसाट, मिलिंद देसाई, सौ. मेघा शिरसाट, नागेश नेमळेकर, संजय भोगटे, सौ.दीपलक्ष्मी पडते, के.एल.फाटक, प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर, चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, सुनील बांदेकर, डॉ.सावंत, सुदर्शन शिरोडकर, हेमंत जाधव, साईराज जाधव, धीरज पांचाळ, विजय कांबळी, रूपेश कानडे, राकेश नेमळेकर, प्रवीण काणेकर, निलेश परब, अ‍ॅड. राजीव कुडाळकर, विनायक राणे, मुक्ती परब, रेखा काणेकर, डॉ. सावंत गोट्या कोरगावकर, मंगेश चव्हाण, चेतन धुरी, सदा अणावकर, रेवती राणे, आरती कार्लेकर, राजू बक्षी, आबा धडाम, निखील कांदळगावकर आदींसह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज मंत्रपुष्पांजलीसह विविध कार्यक्रम

कुडाळ शहरातील श्री राम मंदिरात सोमवार, 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 8 वा. अभिषेक, मंत्र पुष्पांजली, मंत्रपठण, रामरक्षा 108 आवर्तने, रामपंचायत, महापुजा, नैवेद्य, आरती, दुपारी 3 वा. सुश्राव्य भजने, सायं. 7 वा. दिपोत्सव, सायं. 8 वा. यक्षिणी दशावतार मंडळ, माणगाव यांचा पौराणिक नाट्यप्रयोग रामदर्शन सादर करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने सिध्देश शिरसाट, नागेश नेमळेकर, विवेक पंडीत, बंड्या सावंत, रमा नाईक, मिलिंद देसाई यांनी केले आहे.

Back to top button