Uday Samant Ratnagiri | त्या अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश

Uday Samant Ratnagiri | त्या अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश
Uday Samant
Uday SamantPudhari
Published on
Updated on

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

दिव्यांगांची प्रमाणपत्र जाणीवपूर्वक रखडवणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याची बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी खरडपट्टी काढली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना तत्वज्ञान शिकवणाऱ्या या कर्मचाऱ्याला सर्वांसमोर झापले. दिव्यांगांची सुमारे ३७८ प्रमाणपत्र प्रलंबित आहेत तर १८७ दाखल्यांवर दिव्यांगाची टक्केवारी कमी केल्याचा पराक्रमही उघड झाला आहे.

Uday Samant
Banda Monkey Fever News | बांद्यात माकडतापाची धास्ती! तपासणी मोहीम सुरू

Water Crisis News| उन्हाची लाट अन् पाण्यासाठी पायपीट; नाशिक जिल्ह्यात 52 खासगी टँकरच्या मदतीने पाणीपुरवठात्यामुळे पालकमंत्री सामंत अधिकच संतापले आणि त्या कर्मचाऱ्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले. जिल्हा शासकीय रुग्णालयातील दिव्यांगांच्या प्रमाणपत्राबाबत अनेक तक्रारी होत्या. मंडणगडच्या टोकापासून दिव्यांग प्रमाणपत्रासाठी येतात. परंतु रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांच्या अडेलद्रूपणामुळे दिव्यांगाना वारंवार खेपा माराव्या लागत आहेत.

आतापर्यंत सुमारे ३७८ दिव्यांग प्रमाणपत्र प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जेव्हा तक्रार गेली तेव्हा त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयातील दिव्यांगांच्या प्रमाणपत्राबाबतची बैठक बोलावली.

या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्यासह दिव्यांग विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या विभागाचा आढावा सुरू असताना प्रमाण पत्र अडविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तिथे शहानपण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते मंत्री सामंत यांच्या निदर्शनास आल्यानंतर सामंत यांनी त्या कर्मचाऱ्याचे वाभाडेच काढण्यास सुरुवात केली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील साई मॅनपॉवर या एजन्सीकडून कर्मचारी भरती करण्यात आली आहे. परंतु त्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांचा पीएफ कट करून जमा करण्यात आलेला नाही. याबाबत तक्रार आल्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी एजन्सीच्या मालकाला बोलावले. परंतु त्याऐवजी सुपरवायझला पाठवल्याने सामंत अधिकच संतापले. याबाबत पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करा आणि संबंधित एजन्सीवर कारवाई करून ठेका रद्द करण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या.

Uday Samant
Water Crisis News| उन्हाची लाट अन् पाण्यासाठी पायपीट; नाशिक जिल्ह्यात 52 खासगी टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा

रुग्णांच्या सोयिसुविधांबाबत हलगर्जीपणा नको पालकमंत्री....

साडे तीनशेच्या वर दिव्यांग प्रमाणपत्र प्रलंबित आहेत. त्यात १८७ दिव्यांगांच्या दाखल्यावरील टक्केवारी कमी केली आहे. डॉक्टरनी तापसल्यानंतर जर त्यांना ४० ते ४५ टक्के दिव्यांगाचा दाखला दिला असेल तर तुम्ही परस्पर कमी करणारे कोण. त्या रुग्णाचे व्यंग काही कमी झाले आहे का, तसे असेल तर ते दाखवा.

परंतु या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल मला द्यायचा, असे अत्यंत कडवट भाषेत सामंत यांनी त्या कर्मचाऱ्याला सुनावले. रुग्णांच्या सोयिसुविधांबाबत आम्ही कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. त्यांना योग्य आरोग्य सेवा मिळालेच पाहिजे, असे सामंत यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news