Uday Samant : आगामी निवडणुकीत हाच विजयाचा पॅटर्न राबवूयाः पालकमंत्री उदय सामंत

चिपळूण, गुहागरच्या सत्कार सोहळ्यात अजित पवार राष्ट्रवादीला इशारा
Uday Samant
पालकमंत्री उदय सामंत
Published on
Updated on

चिपळूण : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काय चर्चा करायची ही जबाबदारी माझ्यावर सोडा. तुम्ही स्थानिक नेते एकत्र बसा आणि आगामी निवडणुकीत हाच पॅटर्न राबवू. आता समोरच्यांनीच आम्हाला महायुतीत यायचे नाही, असं सांगितलंय... आमचं कुठं निमंत्रण आहे या म्हणून, असे खळबळजनक विधान जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे चिपळूण व गुहागरमध्ये विजयी झालेल्या युतीच्या नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात केले आणि त्यांनी थेट अजित पवार राष्ट्रवादीला इशारा दिला.

Uday Samant
Uday Samant Statement | राजापूरला विकास निधी कमी पडू देणार नाही

शहरातील अतिथी सभागृहात आज (दि.22) दुपारी हा सत्कार सोहळा झाला. यावेळी व्यासपीठावर फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, भाजपा नेते प्रशांत यादव, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, विपुल कदम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, रत्नागिरीचे राहूल पंडीत, राजेश बेंडल, गुहागरच्या नगराध्यक्षा निता मालप, चिपळूण व गुहागरचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ना. सामंत यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले, आम्हाला फसवलं हे सगळ्यांना सांगणे हे किती खोटारडेपणाचे लक्षण आहे हे आज सर्वांनी ओळखले पाहिजे. ज्यांनी रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले, त्यांनी आम्हाला फसविले म्हणणे खरे आहे का? संपूर्ण निवडणुकीत आपण टीका केली नाही. केवळ विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढविली आणि लोकांनी आज आपल्यावर विश्वास ठेवून विजयी केले. आता उमेश सकपाळ यांची जबाबदारी वाढली आहे. भविष्यातील पाच वर्षांत चांगले काम करावे. तुम्ही चांगले काम केले नाही तर पुढे लोकं तुम्हाला निवडून देणार नाहीत याचे भान ठेवावे. याची जबाबदारी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी घ्यावी, असे सुनावले. आगामी निवडणूक संदर्भात बोलताना ते म्हणाले, युती करायची की नाही ही जबाबदारी माझ्यावर सोडा. समोरच्यांनी आम्हाला युतीत यायचे नाही हे आधीच सांगितले आहे. आम्ही महायुती जपण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही देवेंद्रजींना जेवढा सन्मान देतो, तेवढाच एकनाथ शिंदे यांना, आणि तेवढाच अजित पवार यांना देतो. त्यामुळे आमची दारं खुली होती. स्वतःहून जर ती कुणी बंद केली असतील तर स्वतःहून ती उघडण्याचा प्रयत्न कुणी करू नये असे आज जिल्हाप्रमुखांना सांगतो. त्यांना जर आपल्याबरोबर यायचे नाही तर आपण त्यांच्याबरोबर का जायचे? असा सवालही उपस्थित केला. अशा युतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे नुकसान होते. अंकूश आवले किंवा निहारसारखा कार्यकर्ता भरडला असता, असे बोलून दाखविले.

ते पुढे म्हणाले, आज जिल्ह्यामध्ये राजापुरात 10 नगरसेवक निवडून आले. लांजा, रत्नागिरी, चिपळूण, खेड शिवसेनेने जिंकली. गुहागर, देवरूख भाजपने जिंकले. त्यामुळे जिल्ह्यात युतीची सत्ता आहे. आता सर्व प्रश्न सोडविण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून आपण घेतो. चिपळूण आणि गुहागरच्या विकासासाठी एक रूपयाही कमी पडू देणार नाही असे आज जाहीरपणे सांगतो. युतीवर विश्वास टाकलात, तुमचा भ्रमनिरास होणार नाही असा शब्द देतो असे ना. सामंत यांनी सांगितले. सूत्रसंचालन राकेश शिंदे यांनी केले तर नगरसेवक शशिकांत मोदी यांनी आभार मानले.

चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रभारी म्हणून जबाबदारी असलेले भाजपचे नेते प्रशांत यादव यांनी यावेळी सांगितले की, आजचा हा महायुतीचा विजय झाला आहे. आता नागरिकांच्या विकासकामांसंदर्भात असलेल्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे तर ज्यांनी-ज्यांनी या विजयात मेहनत घेतली त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे सांगितले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी, माझ्या विजयात महायुतीसह सर्व नागरिकांचा मोठा वाटा आहे. नागरिकांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्यातूनच माझा विजय झाला. माझ्या विजयामागे सर्वात मोठे योगदान पालकमंत्री उदय सामंत यांचे आहे. त्यांची शहरातील नागरिकांशी नाळ जुळली आहे. आता चिपळूण शहरातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा सकपाळ यांनी व्यक्त केली.

Uday Samant
Uday Samant : खा. राणे आणि मी जिल्ह्यात महायुतीसाठी आग्रही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news