Chiplun Accident: प्रियकरासोबत झालेला वाद भोवला! भरधाव थारची रिक्षाला जोरदार धडक; दोन्ही चालकांसह ५ ठार

डॉक्टर प्रेयसी सुखरूप
Chiplun Thar Rikshaw accident
प्रियकरासोबत झालेला वाद भोवला! भरधाव थारची रिक्षाला जोरदार धडक; दोन्ही चालकांसह ५ ठारPudhari
Published on
Updated on

Chiplun Thar Rikshaw accident

चिपळूण: मुसळधार पावसामुळे मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असतानाच अपघातांचे सत्रही सुरूच आहे. सोमवारी दुपारी चिपळूणजवळील पिंपळी (केनॉल) येथे भरधाव थार जीप आणि प्रवासी रिक्षाचा झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पिंपळी नुराणी मोहल्ला येथील चौघांचा समावेश असून थार चालकाचाही त्यात मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियानातील थार गाडी अतिवेगाने जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक बसली. धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षा चक्काचूर झाली. रिक्षा चालकासह रिक्षातील आई वडील व पाच वर्षाचा मुलगा असे प्रवासी जागीच ठार झाले, तर थारचा चालकही मृत्यूमुखी पडला. अपघातानंतर थार गाडी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Chiplun Thar Rikshaw accident
राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांचा आज भाजप प्रवेश

अपघातानंतर उघडकीस आलेली आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, थार गाडीत एक महिला होती. चालकाने तिला जबरदस्तीने गाडीत बसवले होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. अपघाताच्या अगोदर ती महिला “वाचवा, वाचवा” अशी आरडाओरड करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांच्या सतर्कतेने खेर्डी येथे या महिलेला सुखरूप वाचवण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच चिपळूणचे डीवायएसपी बेले, पोलीस निरीक्षक यंत्रणेसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चिपळूण येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. पुढील तपास सुरू असून थार गाडी नेमकी कशी व कोणत्या उद्देशाने प्रवास करत होती, तसेच अपघाताच्या कारणांचा शोध सुरू आहे.

Chiplun Thar Rikshaw accident
Ratnagiri rain : रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा तडाखा

या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपळी नुराणी मोहल्ला येथील चार नागरिकांचा अकस्मात मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news