Crime News : परभणीतील एका गंभीर खून प्रकरणाचा उलगडा करण्यात यश

एआय तंत्रज्ञानाची कमाल; रत्नागिरी पोलिसांच्या 'RAIDS' अॅपमुळे
Crime News
Crime News : परभणीतील एका गंभीर खून प्रकरणाचा उलगडा करण्यात यशfile photo
Published on: 
Updated on: 

Success in solving a serious murder case in Parbhani

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित 'RAIDS' (रेड्स) अॅपच्या मदतीने परभणी जिल्ह्यातील एका गंभीर खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

Crime News
Sambhajinagar News : खुनातील जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती; इम्रान मेहंदीला जामीन

९ मे २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जायकवाडी धरणाच्या कालव्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाण्यात राहिल्यामुळे मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे मयताची ओळख पटवणे परभणी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनले होते.

नातेवाईकच निघाले आरोपी

तांत्रिक प्रक्रियेतून तयार केलेल्या छायाचित्रामुळे मृत व्यक्तीची ओळख पटली असून, त्यांचे नाव गिताराम प्रकाश मुजमुले (रा. देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी) असे निष्पन्न झाले. ओळख पटल्यानंतर परभणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यामध्ये मृत गिताराम यांचे वडील प्रकाश सखाराम मुजमुले आणि भाऊ कृष्णा प्रकाश मुजमुले यांनीच हा खून केल्याचे समोर आले. परभणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

Crime News
Sambhajinagar News : पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात संभाजीनगर देशात तिसरे

रत्नागिरी पोलीस दलाच्या या नावीन्यपूर्ण एआय उपक्रमामुळे गुन्हे तपासात आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. अर्जुन यशवंत कनगुटकर (६५, रा. टेंबवाडी कोळंबे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कर्मचारी वैभव कांबळे यांनी तक्रार दिली. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी संशयित हा आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना बागवाडी ते मधलावठार जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RAIDS ॲपने कसा लावला छडा ?

Unidentified Unidentified Person या तपासात रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाने विकसित केलेल्या एआय आधारित 'RAIDS' अॅपचा वापर करण्यात आला. या अत्याधुनिक अॅपच्या माध्यमातून अनोळखी मृतदेहाच्या कवटीच्या रचनेवरून चेहऱ्याची प्रतिमा (Face Reconstruction) पुनर्रचित करण्यात आली. ही पुनर्रचित प्रतिमा विविध ठिकाणी प्रसारित करून गावोगावच्या पोलीस पाटलांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्याचे मार्गदर्शन रत्नागिरी पोलिसांनी परभणी पोलीस दलाला केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.