Sambhajinagar News : पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात संभाजीनगर देशात तिसरे

पीएम स्वनिधी योजना : दिल्लीतील सोहळ्यात आयुक्तांसह उपायुक्तांचा गौरव
Sambhajinagar News
Sambhajinagar News : पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात संभाजीनगर देशात तिसरेfile photo
Published on: 
Updated on: 

Sambhajinagar ranks third in the country in economic empowerment of street vendors

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पथविक्रेत्यांना आर्थिक आधार देत त्यांचे व्यवसाय पुन्हा उभे करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने देशपातळीवर ठसा उमटविला आहे. तब्बल ३२ हजार ५८२ पथविक्रेत्यांना पहिल्या कर्जाचा लाभ देत शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केल्याने मनपाने राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल शुक्रवारी (दि.२०) दिल्ली येथे आयोजित स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ सोहळ्यात मनपाचा गौरव करण्यात आला.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : खुनातील जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती; इम्रान मेहंदीला जामीन

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पीएम स्वनिधी योजनेतंर्गत महापालिकेने ३२ हजार ५८२ पथविक्रेत्यांना पहिल्या कर्जाचा लाभ देत शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती करत देशभरातून तिसरा क्रमांक पटकावला. त्यानिमित्त शुक्रवारी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते मनपा आयुक्त अमोल येडगे आणि उपायुक्त अपर्णा थेटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) विभागाचे भारत मोरे आणि सुरेंद्र पाटील उपस्थित होते.

दरम्यान, कोविड-१९ महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पथविक्रेत्यांना कर्जसहाय्य देऊन त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करणे आणि आर्थिक सक्षमीकरण करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यात मार्च २०२६ पर्यंत मनपाने पहिल्या कर्ज वितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.

या यशात आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त अपर्णा थेटे तसेच एनयूएलएमअंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. पथविक्रेत्यांचे आर्थिक सक्षमीकरण, व्यवसायवृद्धी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मनपा यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही प्रशासनाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.