file photo
file photo

रत्‍नागिरी : गणपतीपुळे येथून महिला बेपत्‍ता

Published on

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा सांगलीहुन मैत्रिणींसह (सोमवार) गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेली (57 वर्षीय) महिला अचानकपणे बेपत्ता झाली आहे. तेथील सिसिटीव्ही फुटेजमद्ये संबंधीत महिला एका दुचाकीवर मागे बसून जाताना दिसून येत आहे. सुनीता रामचंद्र पाटील उर्फ निकिता असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, सोमवारी या ग्रुपमधील सर्व महिला समुद्राच्या ठिकाणी होत्‍या. यावेळी सुनीता पाटील अचानक गायब झाल्या. त्या कुठेही दिसून येत नसल्याने त्यांच्या मैत्रिणींनी त्यांचा आजूबाजूला शोध घेतला, परंतु त्या मिळून आल्या नाहीत. अखेर त्यांच्या पतीला याबाबत फोनवर माहिती दिली. महिलेच्या पतीने गणपतीपुळे येथे आल्यानंतर गणपतीपुळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तेथील सिसिटीव्ही फुटेज तपासले असता त्‍या एका दुचाकीवरून जाताना दिसून आल्‍या.

या प्रकरणी अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news