Rajapur Crime | राजापूर : पोषण आहारातील तांदळावर डल्ला मारण्याचा प्रयत्न; मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल

नाटेनगर विद्यामंदिर येथे पोषण आहारातील तांदूळ चोरून नेताना गावकऱ्यांनी गाडी पकडली
Police Inspector Assault Case
Crime News (Pudhari Photo)
Published on
Updated on

Rajapur mid day meal fraud

राजापूर: शालेय विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहारातील तांदळाच्या दहा पोत्यांवर डल्ला मारण्याचा झालेला प्रयत्न जागरूक ग्रामस्थांनी हाणून पाडल्याची घटना नाटे येथे बुधवारी (दि.५) मध्यरात्री घडली. पकडण्यात आलेल्या गाडीमध्ये शालेय पोषण आहारातील 50 किलो वजनाची 10 पोती आढळून आली.

अखेर प्रकरण नाटे पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्या शाळेचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक आणि दोन ग्रामस्थ अशा संशयित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उघड होताच स्थानिक ग्रामस्थांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Police Inspector Assault Case
Ratnagiri : राजापूर कचरा प्रकल्पातून 12.6 टन खतनिर्मिती

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री सुमारे ९.३० वाजता नाटेश्वर मंदिरात त्रिपुरा पौर्णिमेचा उत्सव सुरू असताना मकरंद मधुसुदन धाक्रस (वय ३७, रा. नाटे भराडीन) हे मंदिरात उपस्थित होते. त्याचदरम्यान रात्री १.२४ वाजता मनोज आडविरकर यांनी त्यांना फोन करून माहिती दिली की, नाटेनगर विद्यामंदिर येथे मुलांच्या पोषण आहाराकरिता आलेला तांदूळ चोरून नेताना गावकऱ्यांनी एक गाडी पकडली आहे.

त्यानंतर धाक्रस यांनी शाळेचे शिपाई रविकांत भगवान धामापुरकर यांना फोन करून शाळेत पाठविले. त्यावेळी शाळेच्या पटांगणात उभ्या असलेल्या गाडीची (MH-08-AP-6927) झडती घेतली असता ५० किलो वजनाची एकूण १० पोती पोषण आहाराची भरलेली आढळून आली. त्यानंतर त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या वाहन चालकाकडे अधिक चौकशी केली असता धक्कादायक प्रकार पुढे आला.

Police Inspector Assault Case
Sangli : राजापूर येथील प्रेमीयुगुलाची तासगावात संपविले जीवन

पकडण्यात आलेली गाडी ही कुणाल अनिल थळेश्री (रा. नाटे बांदचावाडी) याची असून त्याच्यासोबत सुनिल वसंत डुगीलकर (रा. नाटे बांदकरवाडी) हेही उपस्थित होते. पकडण्यात आलेल्या वाहनामध्ये सापडलेले तांदूळ हे विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकरिता आलेले होते. सदर तांदळाची किंमत अंदाजे ७,५०० असून, गाडीची किंमत ३ लाख अशी मिळून सुमारे ३,०७, ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

दरम्यान, मकरंद धाक्रस यांच्या लेखी तक्रारीवरून सागरी पोलीस ठाणे, नाटे यांनी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र तानू जाधव, सहाय्यक शिक्षक नाना बिरा करे, कुणाल अनिल थळेश्री, सुनील वसंत डुगीलकर अशा चार संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहायक पोलीस फौजदार यु. सी. पिलनकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news