

राजापूर : काही वर्षांपूर्वी कचर्याचे ढीग आणि त्यामुळे पसरणारी दुर्गंधी यामुळे वादाच्या भोवर्यात सापडलेल्या राजापूर नगर परिषदेच्या हर्डी येथील घनकचरा प्रकल्पाचे नजीकच्या काही वर्षांमध्ये रूपडे पालटले आहे. शहरामध्ये दररोज संकलीत होणार्या कचर्याद्वारे घनकचरा प्रकल्पामध्ये सेंद्रीय खतनिर्मिती केली जात असून त्याला शासनाचा हरित ब्रँड म्हणून मान्यताही प्राप्त झालेली आहे. या प्रकल्पातून वर्षाला सुमारे 12.6 टन खतनिर्मिती केली जात आहे. राजापूर नगर पालिकेने टाकाऊ आणि निष्क्रिय कचर्याचा सदुपयोग करीत निर्माण केलेल्या या सेंद्रीय खाताला शेतकर्यांसह बागायतदारांकडून मोठी मागणी आहे. त्यामुळे या सेंद्रीय खताच्या विक्रीतून मर्यादीत उत्पन्नाचे स्रोत असलेल्या क वर्गीय राजापूर नगरपरिषदेला उत्पन्नाचा नवा स्त्रोतही उपलब्ध झाला आहे.
राजापूर नगरपरिषदेने काही वर्षापूर्वी लगतच्या हर्डी गावामध्ये सुमारे 1 एकर जागेमध्ये घनकचरा प्रकल्प उभारला आहे. शहरात गोळा होणारा कचरा या प्रकल्पामध्ये आणून टाकला जात होता. काही वर्षांपूर्वी अगदी मृत कोंबड्यांपासून मृत जनावरेही या प्रकल्पस्थळी आणून टाकली जात होती. त्यामुळे या कचर्यावर भटकी कुत्री, मोकाट जनावरे तुटून पडत असत. प्रकल्पामध्ये केवळ कचरा टाकण्याचे काम केले जात होते. याची योग्य प्रकारे विल्लेवाट लावली जात नव्हती. त्यामुळे घनकचरा प्रकल्प भरून रस्त्यापर्यंत कचर्याचे ढीग पसरले होते. या कचर्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे हर्डी ग्रामस्थ आणि नगर परिषद प्रशासन यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. घनकचरा प्रकल्प गावातून हद्दपार करण्यासाठी हर्डी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत अर्ज, निवेदनाबरोबरच घनकचरा प्रकल्पस्थळी जाणार्या कचर्याच्या गाड्या अडविणे, कचरा टाकण्यास हरकत घेणे तसेच उपोषणाचे हत्यारही उपसले होते. यामुळे या घनकचरा प्रकल्पावरून ग्रामस्थ व नगरपरिषद यांच्यामधील संघर्ष टोकाला पोहोचला होता. त्यावेळी पालकमंत्र्यांसहजिल्हाधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालावे लागले होते या प्रकल्पामुळे होणारे प्रदुषण थांबवा आणि योग्य प्रकारे व्यवस्थापन करा अशा सूचना संबंधितांनी राजापूर नगर परिषद प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर स्वच्छ भारत व स्वच्छ सर्वेक्षण 2018 या उपक्रमांतर्गत शहरातील घराघरात ओला कचरा,सुका कचरा घातक कचरा असे वर्गीकरण होऊ लागले आणि मग हा कचरा प्रकल्पस्थळी नेऊन त्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुरुवातीला घनकचरा प्रकल्पस्थळातीत कचर्याचे ढीग पूर्णपणे हटवून प्रकल्प स्थळ मोकळे करण्यात आले. शासनाच्या 14 ज्या वित्त आयोगातून सुमारे 22 लाख रूपये खर्चून या ठिकाणी संपूर्ण प्रकल्पस्थळाला कंपाऊंड वॉल, रस्ता आणि गांडूळ खत निर्मिती प्रकल्प यासारखी कामे करण्यात आली आहेत. घनकचरा प्रकल्पामध्ये एक टन क्षमतेचे कंपोस्ट खत निर्मिती मशिन कार्यान्वित करण्यात आले आहे. या मशिनच्या सहाय्याने ओल्या कचर्यावर प्रक्रीया होवून 24 तास खत निर्मिती होत आहे. या सेंद्रीय खताचा दर्जा उत्तम असून त्याता शासनाचा हरित बॅन्डदेखील प्राप्त झालेला आहे. या खत निर्मिती प्रकल्पातून वर्षाला सुमारे 12.6 टन खत निर्मिती होत असून या खताच्या विक्रीतून नगरपरिषदेता चांगले उत्पन्न मिळत आहे.
राजापूर शहराचा विचार करता शहराची लोकसंख्या सुमारे 9 हजार 753 इतकी आहे. यासाठी किमान 500 ते 150 स्वच्छता कर्मचा-यांची आवश्यकता आहे. मात्र सध्या राजापूर नगरपरिषदेत स्वच्छता विभागात कायमस्वरूपी 17 व तात्पुरत्या स्वरूपात घेतलेले 30 असे सुमारे 47 कर्मचारी आहेत. शहराची चढउताराची डोंगराळ भौगोलिक रचना, अरुंद रस्ते आणि अपुरा कर्मचारी वर्ग असतानाही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेचे सुरु असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. शहरात पूर्वी ठिकठिकाणी कचरा कुंड्या कचर्याने भरून त्याबाहेरही कचर्याचे ढीग पडलेले असायचे. मात्र आता कचरा कुंड्याही राहिल्या नाहीत आणि कचर्याचे ढीगदेखील दिसत नाहीत. त्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचार्यांचे हातही दिवसभर स्वच्छतेसाठी राबत आहेत.
आरोग्य विभागातर्फे स्वच्छ आणि सुंदर शहर ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेते आहे त्या नियोजनाची अंनत्तकजावणी करताना त्यामध्ये लोकांनाही सहभागी करुन घेतले जात आहे. विविध उपक्रम राबवून लोकाना स्वच्छतेचे महत्व पटवून देत स्वयंस्फूर्तीने घराची आणि परिसराची पर्यायाने शहराची स्वच्छता ठेवण्यासाठी लोकांची मानसिकता तयार करण्यात पालिका प्रशासन यशस्वी ठरत आहे चाजारपेठेतीत्त स्वच्छता ठेवण्यासाठी अभिनव उपक्रम राबविताना सायंकाळी बाजारपेठ बंद झाल्यावर स्वच्छ करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे स्वच्छ शहर ठेवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र शासनातर्फे घेण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्ये राजापूर नगर पालिकेने सातत्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांना गवसणी घातली आहे.