Rajapur Crime | नाटे येथील घरफोडीचा अवघ्या काही दिवसांत छडा; दोन आरोपी जेरबंद

निक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Rajapur Nate Housebreak
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केलीPudhari
Published on
Updated on

Rajapur Nate Housebreak

राजापूर : नाटे येथील घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीतील १.९१ लाख किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ते ५ मार्च २०२६ दरम्यान नाटे येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २.९१ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता, २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Rajapur Nate Housebreak
Ratnagiri crime : अल्पवयीन मुलावर अत्याचार; न्यायालयाने आरोपीला सुनावली जन्मठेप आणि १० हजार दंड

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी २८ जुलै रोजी दोन संशयितांना ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान त्यांनी सदर घरफोडीची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विकास टीपू पवार (वय २३) आणि संपत विलास पवार (वय २०) अशी असून, दोघेही सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून चोरीतील दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना नाटे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Rajapur Nate Housebreak
Ratnagiri Crime : प्रेमाच्या आमिषाने १७ वर्षीय मुलीचे अपहरण; चिपळूणमध्ये डांबून अत्याचार

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, योगेश नार्वेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news