Ratnagiri Police AI App : एआयच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध

रत्नागिरी पोलिसांचा देशातील पहिलाच प्रयोग; रत्नागिरी ॲडव्हान्स इंटेग्रेटेड डाटा सिस्टीम ॲप
Ratnagiri Police AI App
एआयच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी पोलिस दलाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन रत्नागिरी ॲडव्हान्स इंटेग्रेटेड डाटा सिस्टीम (RAIDS) हे नावीन्यपूर्ण डिजिटल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. त्यामुळे तपासामध्ये गती आणि नेमकेपणा येणार आहे. या ॲपचा पहिल्यांदाच वापर करत रत्नागिरी शहर पोलिसांनी जिल्ह्यातील एका हरवलेल्या मुलीचा शोध घेतला आहे. त्यामुळे ॲपची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. तपासासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर केलेला हा भारतातील पहिलाच प्रयोग असून, त्याव्दारे तपासात नवीन दिशा पोलिस विभागाला दिली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ॲपमध्ये पुढीलप्रमाणे एकूण तीन प्रकार आहेत.

Ratnagiri Police AI App
Ratnagiri Accident: निवळीतील तिहेरी अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू

1) ‌‘देव दृष्टी : या तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यामधील मिसिंग असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येऊ शकतो व जिल्ह्यामधील हिस्ट्री शिटर्स, वॉन्टेड आरोपी, एनडीपीएसमधील आरोपींचे फोटो या ॲपमध्ये डेटाबेस स्वरूपात आहेत. या ॲपद्वारे कृत्रिम बुध्दिमत्ता तंज्ञज्ञानाचा वापर करून आरोपींचे विविध 108 प्रकारचे इमेजेस बनवले जाऊ शकतात. जेणेकरून पोलिस फिल्डवर जेव्हा आरोपीला शोधण्यासाठी जातात तेव्हा आरोपीने त्याची वेषभूषा बदलली असली तरी यामध्ये आरोपीला दाढी काढून, केस वाढवून, लांब केस ठेवून,टक्कल करुन आरोपी फरार किंवा लपून राहू शकतो. अशावेळी त्याला ओळखण्याकरता याचा वापर करण्यात येत आहे.

2) ‌‘देव रुपरेखा‌’: यामध्ये आरोपी फक्त कुणाला तरी दिसले आहेत किंवा त्यांचा पोलिस स्टेशनमार्फत एका पोलिस स्केच आर्टिस्टकडून स्केच तयार करण्यात आलेला आहे. किंवा एखादा मृतदेह,सडलेले मानवी शरीर किंवा सांगाडा याचा फोटो असला तरी हा फोटो देव रुपरेखामध्ये अपलोड करुन त्याची नवीन इमेज तयार करता येते.

3) बी. एन.एस अनॅलिसिस : यामध्ये पोलिस कामकाजात वापरासाठी भारतीय न्यास संहिता,2023 मध्ये एखादे कलम ओळखता आले नाही तर या ॲप्लिकशनमधील सर्व बारमध्ये फक्त केलेल्या गुन्ह्याचे वर्णन लिहिले तर लागलीच त्यामध्ये कलम सहित सजेशन येते. उदा. मर्डर सर्च केले तर त्यापुढे सर्च बारमध्ये कलम 103 असे येते. त्यामुळे हे (RAIDS) ॲप रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी -अंमलदारांना तपास कामासाठी उपयोगी ठरत आहे.

Ratnagiri Police AI App
Ratnagiri Police Mission : पोलिस दलाचा ‌‘मिशन परिपूर्ती‌’ उपक्रम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news