

नाणीज; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथील निर्मलवाडी जवळ आज (दि.११) सकाळी पेट्रोलचा टँकर उलटला. या अपघातात चालक जखमी झाला. टँकर उलटल्यानंतर त्यातून पेट्रोल गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
सकाळी १०.१५ वाजता भारत पेट्रोलियमचा पेट्रोलने भरलेला टँकर उलटला. त्यातून पेट्रोल गळती सुरू झाली. याबाबत माहिती मिळताच रत्नागिरी येथील मोटार वाहन निरीक्षक कोराणे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. टँकरच्या चालकाला श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा :