

रत्नागिरी: रत्नागिरी आगारातील चार्जिंग स्टेशनचे काम आचारसंहितेमुळे रखडलेले आहे. त्यामुळे गणेशोत्सव, दिवाळीनंतर नवीन वर्षाचा मुहूर्त ही हुकण्याची शक्यता असून नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात ई-बसेस रस्त्यावर धावण्याची शक्यता धूसरच दिसत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित काम संपेल आणखी एक ते दोन महिने चार्जिग स्टेशनचे काम पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीनंतरच ई-बसेस रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे.
वाढत्या इंधन दरवाढीमुळे आता एसटी महामंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक ई-बसेस, सीएनजी बसेस सुरू करण्यात आले आहे. दापोलीतील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण होवून ई-बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. तसेच प्रायोगिक तत्त्वार चिपळूणमध्ये सीएनजी बसेस सुरू झाल्या आहेत.दरम्यान, रत्नागिरीसह इतर ठिकाणी ई-बसेससाठीचे चार्जिंग स्टेशनचे काम सुरू आहे. चार्जिंग स्टेशनचे काम डिसेंबरमध्ये होवून जानेवारी महिन्यात ई-बसेस रस्त्यावर धावतील असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झालेले नाही. त्यात निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे काम रखडले आहे. अद्याप काम संथगतीनेच सुरू आहे. गणेशोत्सव, दिवाळीनंतर नवीन वर्षाचे मुहूर्त हुकणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात ई-बसेस रस्त्यावर धावण्याची शक्यता कमीच आहे.
या चारठिकाणी चार्जिंग स्टेशन
रत्नागिरी शहर, चिपळूण, खेड, दापोली या चार ठिकाणी चार्जिंग स्टेशन असणार आहे. त्यापैकी दापोली येथील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन तालुक्यातील काम सुरू आहे.