

रत्नागिरी: भाताचे कोठार म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरला असून रब्बी हंगाम ही उशिराने सुरुवात झाली.यंदा 5 हजार 405 हेक्टर क्षेत्रावर कडधान्य आणि भाजीपाला लागवड करण्यात येणार आहे. आतापर्यंत तीन हजारहून अधिक हेक्टरवर पेरण्यापूर्ण झाल्या आहेत. एकूण 60 ते 65 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. रब्बी पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळी खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बी हंगाम उशिराने सुरुवात झाली. जिल्ह्यात सरासरी 6 हजार हेक्टरवर रब्बी पिकांचे लागवड क्षेत्र आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने वांगी, टोमॅटो, मिरचा, मुळा, पडवळ, वाल, दोडके, कारली, भेंडी, दुधी, घोसाळी, तोंडली, दोडक, काकडी इत्यादी भाज्यांची पेरणी केली. कडधान्य कुळीथ, पावटा, हरभरा, कडवा, पावटासह इतर कडधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. काही तालुक्यात ऊस ही लावण्यात आले आहे. भात कापणी, मळणी झाल्यानंतर रब्बी हंगामाला सुरूवात होते. यंदा पावसाचा मुक्काम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होता. त्यामुळे रब्बी हंगाम पुढे सरकला आहे. रब्बी हंगामची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. आतापर्यंत 3 हजाराहून अधिक हेक्टवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.