Ratnagiri Accident : मंडणगडमध्ये चारचाकीचा अपघात; दोघांचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी

आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील दुर्घटना
Ratnagiri Accident News
मंडणगडमध्ये चारचाकीचा अपघात; दोघांचा मृत्यू
Published on
Updated on

मंडणगड : आंबडवे - लोणंद राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील शिरगाव येथे मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास नाशिकवरून मंडणगडकडे येणाऱ्या वॅगनार (एमएच 08 एएक्स 9589) कारवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार गटारात कोसळून झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले.

Ratnagiri Accident News
Solapur Accident | माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारला शेटफळजवळ अपघात ; सीटबेल्टमुळे वाचले प्राण

या अपघातात शंकर करमरकर (46, रा. देहेण, राजापूर सध्या वास्तव्य दापोली), हर्षदा जोशी (70, रा. टिळक आळी रत्नागिरी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात याच गाडीतून प्रवास करणारे प्रमोद मुकुंद लिमये (65) आणि ओंकार प्रमोद लिमये (35, दोघेही रा. केळशी, तालुका दापोली) यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना पुढील उपचारासाठी भिंगळोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच माहिती मंडणगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करुन पुढील प्रक्रिया सुरु केली. अपघातातील जखमीवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारांकरिता अन्यत्र पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताचा पुढील तपास मंडणगड पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे मंडणगड तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Ratnagiri Accident News
Saudi Arabia Bus Accident | सौदीतील अपघातात हैदराबादच्या 45 जणांचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news