Yogesh Kadam | खेडमध्ये ‘उमेद मॉल’साठी १९ कोटी ९९ लाख ९७ हजारांचा निधी मंजूर : योगेश कदम

महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ
Yogesh Kadam
गृहराज्यमंत्री योगेश कदम File Photo
Published on: 
Updated on: 

Umed Mall Khed

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील महिला स्वयं-सहाय्यता समूहांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खेड येथे उभारण्यात येणाऱ्या ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी १९ कोटी ९९ लाख ९७ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. आमदार तथा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीला चालना देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

Yogesh Kadam
Yogesh Kadam | सोशल मीडियावरून पक्ष चालत नाही; तरुण एकत्र येत असतील तर स्वागतार्ह : योगेश कदम

रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंबा, काजू, कोकम, जांभूळ, सुपारी, मत्स्यप्रक्रिया उत्पादने, भात, नाचणी तसेच स्थानिक हस्तकला उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याची मोठी क्षमता आहे. मात्र, अनेक महिला बचत गटांना विक्रीसाठी हंगामी प्रदर्शने आणि आठवडा बाजारांवर अवलंबून राहावे लागते. उमेद मॉलमुळे या उत्पादनांना कायमस्वरूपी विक्री केंद्र उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

या केंद्राच्या माध्यमातून उत्पादनांचे ब्रँडिंग, आकर्षक पॅकेजिंग, दर्जा नियंत्रण आणि विक्री व्यवस्थेला प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे महिला उद्योजकांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची शक्यता आहे.

Yogesh Kadam
Yogesh Kadam | आढावा बैठक म्हणजे केवळ आकडे वाचन नव्हे; मंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना सुनावले

खेड येथे उभारण्यात येणाऱ्या ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) इमारतीच्या बांधकामासाठी १९ कोटी ९९ लाख ९७ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या मॉलच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीला चालना मिळून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ मिळेल.

- योगेश कदम, गृहराज्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news