Ratnagiri Accident : देवरुख-मार्लेश्वर मार्गावर डंपरचा भीषण अपघात

निवेखुर्द येथील अवघड वळणावर डंपर पलटी; चालक केबिनमध्ये अडकला
Ratnagiri Accident
देवरुख-मार्लेश्वर मार्गावर डंपरचा भीषण अपघात
Published on: 
Updated on: 

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-मार्लेश्वर मार्गावरील निवेखुर्द येथे वळणावर शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डंपरचा भीषण अपघात घडला आहे. सुदैवाने चालक बचावला असला तरी तो केबिनमध्ये अडकून पडला आहे.

या मार्गावर डंपरचे अपघात घडत असल्याने तसेच बेदरकारपणे डंपर चालवले जात असल्याने स्थानिक वाहनचालकांसह मार्लेश्वर भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सध्या देवरूख मार्लेश्वर मार्गावर रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारी खडी घेवून जाणारे डंपर बेदरकारपणे चालक चालवत आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या मार्गावर बेदरकारपणे डंपर चालवण्याला चाप कधी बसणार? कोणाचा जीव घेतल्यावरच जाग येणार आहे का? संबंधित ठेकेदाराने याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे. तसेच डंपर चालकांना योग्य ती समज देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण डंपरचालक कसेही डंपर चालवत आहेत. कोणाचा जीव जाण्याअगोदर बेदरकारपणे डंपर चालवणाऱ्या चालकांना कडक समज देणे गरजेचे झाले आहे. नाहीतर हे असेच सुरू राहिले तर रूंदीकरणाचे काम बंद पाडू, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news