Ratnagiri accident | आंबा घाटात कोळशाने भरलेल्या ट्रकच्या केबिनला भीषण आग

स्थानिक यंत्रणेच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
Ratnagiri accident | आंबा घाटात कोळशाने भरलेल्या ट्रकच्या केबिनला भीषण आग
Published on
Updated on

देवरुख : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाट परिसरात रविवारी पहाटे कोळसा वाहतूक करणाऱ्या एका १४ टायरी ट्रकच्या केबिनला अचानक आग लागल्याची थरारक घटना घडली. मात्र, महामार्ग पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि एक मोठा अनर्थ टळला. वाहन क्रमांक MH-09-FL-9047 (१४ टायरी ट्रक) ​चालक शंभू चरण यादव (वय ४८, रा. हजारीबाग, झारखंड)

Ratnagiri accident | आंबा घाटात कोळशाने भरलेल्या ट्रकच्या केबिनला भीषण आग
Accident News : मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटले, अजिंठा घाटातील दरीत हायवा घसरला

३१ टन कोळसा घेऊन (जयगड ते उंब्रज, जि. सातारा प्रवास) हे ट्रक पहाटे सुमारे ४ वाजता, आंबा घाटातील गणेश मंदिराजवळ (रत्नागिरीच्या दिशेने १ किमी) येत असताना ओव्हरहिटिंगमुळे वायरिंगमध्ये झालेले शॉर्टसर्किट ने आग लागली. ​मिळालेल्या माहितीनुसार, ३१ टन कोळसा घेऊन जाणारा हा ट्रक आंबा घाटात आला असता, पहाटे ४ च्या सुमारास इंजिन ओव्हरहीट झाल्याने केबिनच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाले आणि बघता बघता केबिनने पेट घेतला.

Ratnagiri accident | आंबा घाटात कोळशाने भरलेल्या ट्रकच्या केबिनला भीषण आग
Beed accident | काळ आला होता पण वेळ आली नव्हती !कानिफनाथ घाटात ट्रॅव्हल पलटी; ३० प्रवासी सुखरूप

​घटनेची माहिती मिळताच खालील पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिपाली जाधव, पीएसआय पाटील, जीपीएसआय सावंत, पोलीस कर्मचारी वाकरे, लांबोरे, दाभाडे, संकपाळ, शिवलकर आणि चालक कांबळे, हेड कॉन्स्टेबल जाधव, आंबा गावातील 'मृत्युंजदूत' विजय पाटील व त्यांची टीम, देवरुख पोलीस ठाण्याचे कर्मचारी, देवरुख नगरपंचायतीचे अग्निशमन दल आणि महामार्गावरील इतर वाहनचालक यांनी मदत कार्य केले.

Ratnagiri accident | आंबा घाटात कोळशाने भरलेल्या ट्रकच्या केबिनला भीषण आग
Ambenali Ghat Accident : आंबेनळी घाटात आठ मित्रांवर काळाचा घाला

सर्व यंत्रणांनी आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळवणे शक्य झाले. कोळशाच्या साठ्यापर्यंत आग पोहोचण्यापूर्वीच ती विझवण्यात आल्याने मोठा स्फोट किंवा दुर्घटना टळली.​ या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news