Ratnagiri crime | महिला स्त्रीरोग अधिकारी ACBच्या जाळ्यात, लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

कामथे उपजिल्हा रुग्णालयातील घटना, गर्भपाताच्या किटसाठी मागितली होती लाच
Bribe News
Bribe News
Published on
Updated on

चिपळूण : गर्भपात करण्यासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) देण्यासाठी एका गरोदर महिलेकडे ४,५०० रुपयांची लाच मागीतली. दरम्यान ती स्वीकारणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील वर्ग-१ च्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री रंगेहात पकडले. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Bribe News
Bribe Case Nashik | लाच घेतांना तलाठी जेरबंद, लाच लुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

उपजिल्हा रुग्णालय कामथे, ता. चिपळूण, येथे वैद्यकीय अधिकारी, वर्ग-१ या पदावर काम करणाऱ्या डॉ. कांचन शिरीष मदार (वय ४८ वर्षे, रा. पागमळा, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.) असे या लाचखोर महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.

Bribe News
Dhule Bribe Case : धुळ्यात ACBचा धडाका; ज्वारीचा उच्च दर्जा दाखवण्यासाठी ५ हजारांची लाच घेणा-या पुरवठा निरीक्षकाला अटक

या प्रकरणातील तक्रारदार महिला गरोदर होत्या आणि त्यांना गर्भपात करावयाचा होता. याकरिता त्यांनी दिनांक ३ जून रोजी उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. मदार यांनी तक्रारदार महिलेला गर्भपातासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) देण्यासाठी ४ ते ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार महिलेची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्याकडे तक्रार नोंदवली.

Bribe News
Jalna municipal corruption : जालना महापालिकेला लाचखोरीची कीड !

तक्रारदारांच्या अर्जानुसार, आज दिनांक 3 जून रोजीच एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, डॉ. कांचन मदार यांनी गर्भपाताच्या किटसाठी ४,५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करताच एसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचला. डॉ. कांचन मदार यांनी तक्रारदार महिलेकडून ४,५०० रुपयांची लाचेची रक्कम त्यांच्या MH 08 AX 2618 या खाजगी चारचाकी वाहनात स्वीकारली. लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.

Bribe News
Buldhana Bribe Case : जळगाव जामोद येथे 10 हजारांची लाच घेताना भूमिअभिलेखचे दोन कर्मचारी ACB च्या जाळ्यात

याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

रत्नागिरी एसीबीचे पोलीस उप अधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, मच्छिद्र जाधव, सपोफौ उदय चांदणे, पोलीस हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दिपक आंबेकर, श्रेया विचारे, पोलीस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर, महिला पोलीस शिपाई समिता क्षिरसागर आणि चालक पोलीस शिपाई प्रशांत कांबळे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Bribe News
women officers corruption case | दोन महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नागरिकांना आवाहन

अँटी करप्शन ब्युरो, रत्नागिरी तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी (किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती) कामासाठी लाचेची मागणी करत असेल, तर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news