Jalna municipal corruption : जालना महापालिकेला लाचखोरीची कीड !

40 हजारांची लाच; दोन अधिकारी ‌‘एसीबी‌’च्या जाळ्यात
Jalna municipal corruption
जालना महापालिकेला लाचखोरीची कीड !pudhari photo
Published on
Updated on

जालना : नालेसफाई व अतिक्रमण हटविण्याच्या कामासाठी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवार दिनांक 28; रोजी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महानगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये प्रभारी सहायक अतिक्रमण पथक प्रमुख भाऊलाल चापा राठोड (वय 57) व प्रभारी सहायक अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख श्यामसन छबुराव कसबे (वय 51) यांचा समावेश आहे. दोघेही जालना महानगरपालिकेत कार्यरत आहेत.

Jalna municipal corruption
RTE अंतर्गत प्रवेशासाठी ५० हजारांची लाच मागणा-या दोघांना रंगेहात अटक

तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी मामा चौक ते कोलू तेली घाना संघ परिसरातील नाल्यावर झालेली अतिक्रमणे हटविणे व नालेसफाई करण्याबाबत मनपा आयुक्तांकडे निवेदन दिले होते. त्यानंतर उपायुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून नियमानुसार कारवाईचे आदेश दिले होते.

दरम्यान, तक्रारदाराने वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित अधिकारी कारवाईस टाळाटाळ करीत होते. अखेर अतिक्रमण हटविण्याच्या बदल्यात “खर्च” म्हणून 40 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

20 मार्च 2026 रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपींनी 40 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी जुना मोंढा परिसरातील बाबा टी हाऊस येथे सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी श्यामसन कसबे यांनी तक्रारदाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर भाऊलाल राठोड यांनाही ताब्यात घेण्यात आले.

कारवाईदरम्यान आरोपींकडून 40 हजार रुपयांची लाच रक्कम जप्त करण्यात आली. तसेच सॅमसंग व ओप्पो कंपनीचे मोबाईलही जप्त करून त्यांचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक वाल्मिक कोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Jalna municipal corruption
Parbhani crime news | पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात; ८ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

छत्रपती संभाजीनगरच्या पथकाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा कारवाई केली. या पथकात पोनि. वाल्मिक कोरे, पोनि. संतोष तिगोटे, पोलिस हवालदार राजेंद्र सिनकर, राजेंद्र जोशी, चांगदेव बागूल आदींचा समावेश आहे.

येथे करा तक्रार

जिल्हाभरातील कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवा. तसेच भ्रष्टाचारासंदर्भात काही तक्रार असल्यास 1064 या टोल फ्रि क्रमांकावर तक्रार नोंदवावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news