रत्नागिरी: गोवळकोट येथील गोविंदगडावर सापडले ८० तोफ गोळे

तोफ गोळे मिळण्याची ही पहिलीच वेळ
Govindgad in Gowalkot
गोवळकोट येथील गोविंदगडावर ८० तोफ गोळे सापडले Pudhari News Network

चिपळूण: पुढारी वृत्तसेवा : शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर फिरण्यासाठी आलेले शुभम हरवडे, सनी गिजे, युवराज बेचावडे, ऋग्वेद हरवडे, दिगंबर बांद्रे हे गडावरती फेरफटका मारत असताना त्यांना सुरवातीला तोफेचे २ गोळे दिसून आले. तेथील माती बाजुला केली असता त्यांना अजूनही काही तोफांचे गोळे आढळून आले.

Govindgad in Gowalkot
रत्नागिरी : कोंडसर खाडीत दोघांचा बुडून मृत्यू

त्यांनी तातडीने राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोटचे अध्यक्ष विशाल राऊत यांना संपर्क केला. त्यांनी उपस्थित मुलांना योग्य त्या सूचना देऊन एक एक गोळा बाहेर काढण्याचे काम सुरू केले. बघता बघता मुलांना सुमारे ८० पेक्षा जास्त गोळे बाहेर काढण्यात यश आले. सदरचे गोळे हे दगडी तोफगोळे असून राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली १० वर्ष संवर्धनाचे काम चालू असताना या आधी चार ते पाच गोळे मिळाले होते.

Govindgad in Gowalkot
रत्नागिरी : पर्समधील मोबाईलच्या आधारे बँक खात्यातील १ लाख लंपास

गडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तोफा पाहता गडावर गोळे मिळतील, याचा अंदाज होताच. पण गडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळे मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मिळालेला हा ठेवा म्हणजे हा गडदेवता आई रेडजाई व ग्रामदेवता आई करंजेश्वरी मातेचा आशीर्वादच आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news