रत्नागिरी : कोंडसर खाडीत दोघांचा बुडून मृत्यू

मासेमारीदरम्यान दुर्घटना घडली
Two died by drowning
कोंडसर येथील दोन प्रौढांचा खाडीच्या पाण्यात पडून मृत्यू झाला.Pudhari File Photo

नाटे : राजापूर तालुक्यातील कोंडसर येथील दोन प्रौढांचा खाडीच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सांयकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोंडसर खाडीत सुनील केशव घाणेकर (वय 58) संदीप केशव मोगरकर (45) मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करत असताना तोल जाऊन खाडीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Two died by drowning
अमरावती : पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; छत्री तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

बुडाल्यानंतर या दोघांचाही शोध सुरु असताना सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचे मृतदेह हाती लागले. सागरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अविनाश केदारी यांसह पिलणकर, चव्हाण, कुशल हातिसकर या आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news