रत्नागिरी : पर्समधील मोबाईलच्या आधारे बँक खात्यातील १ लाख लंपास

रेल्वेतून चोरली होती पर्स; चोरट्यास अटक
 Ratnagiri Theft News
चोरट्याने रेल्वेत पर्सची चोरी केली होती.Pudhari File Photo
Published on
Updated on

देवरुख : रेल्वेमध्ये महिलेच्या पर्समधील मोबाईलचा वापर करून बँक खात्यातील पैसे काढणाऱ्या संशयित आरोपीला संगमेश्वर पोलिसांकडून सोमवारी (दि.१) अटक केली. मनिष रमेश पावसकर (वय ३१, रा. जानवळे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.

 Ratnagiri Theft News
अनुपम खेर यांच्या ऑफिस चोरी प्रकरणी २ सराईट चोरट्यांना अटक

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रिया ज्ञानेश्वर संकपाळ या आपल्या पतीसह २५ जून रोजी दादर ते ते सावंतवाडी दरम्यान रेल्वेने प्रवास करत होत्या. यादरम्यान रात्री तीनच्या सुमारास त्यांना झोप लागल्याचे पाहून चोरट्याने त्यांची पर्स चोरून नेली होती. त्यानंतर कडवई येथील रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांच्या पर्समध्ये त्यांचा मोबाईल, रोख रक्कम , पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे होती ती चोरीस गेली. त्यानंतर त्यांनी वैभववाडी (जि. सिंधूदुर्ग) येथे जावून त्यांचे बैंक खाते पाहिले असता त्याचे खात्यातील १ लाख कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढल्याचे दिसून आले. त्यांनतर त्यांनी २६ जूनला वैभववाडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या गुन्हयाचा तपास करत असताना पोलिसांना संशयीत मनिष पावसकर हा संशयितरित्या रेल्वे परिसरात आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पर्स चोरीची कबुली दिली.

 Ratnagiri Theft News
Jalgaon Crime | अल्पवयीन मुलांकडून दुकाने फोडून चोरी, १२ लाखांची चांदी जप्त

ही कामगिरी घनंजय कुलकर्णी पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्रीमती जयश्री गायकवाड अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, मा. निलेश माईनकर उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. नागरगोजे यांच्या सुचनेनुसार सपोफौ सी. टी. कांबळे, व्ही. बी. बरगाले, व्ही. व्ही. मनवल, एस. व्ही. आव्हाड यांनी तपास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news